
दैनिक चालू वार्ता नांदुरा प्रतिनिधी- किशोर वाकोडे
शेंबा (नांदुरा)दि.३१.अहिल्याबाई न्यायदानासाठी विशेष ओळखल्या जातात. सार्यांना समान न्याय मिळेल यासाठी त्या विशेष लक्ष देत होत्या. एकदा संस्थानचा सुभेदार तुकोजी होळकर यांच्या मुलाने प्रजेला त्रास दिला म्हणून त्यालाही तुरुंगात डांबण्यात त्यांनी मागेपुढे पाहिले नव्हते. अहिल्याबाईंचे राज्य हे कायद्याचे राज्य होते त्यामुळे जनता समधानी होती. राजमाता अहिल्यादेवी होळकरांची २९७ जयंती ग्रामपंचायत कार्यालय शेंबा येथे साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच ॲड.नंदकिशोर खोंदले हे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड.नंदकिशोर खोंदले हस्ते करण्यात आले. यानंतर अहिल्यादेवी होळकर यांचे जीवन चरित्र कैलास सुशिर, सारंगधर घोंगे, पि.के. राठोड तसेच सरपंच नंदकिशोर खोंदले आदी.मान्यवरांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. ‘महापुरुषांनी केलेले कार्य कागदोपत्री न ठेवता आचरणात आणावे’. असे सरपंच ॲड. नंदकिशोर खोंदले यांनी सांगितले. याप्रसंगी उपसरपंच जगन्नाथ भोपळे, ग्रा.प. सदस्य प्रवीण भिडे, सुधाकर बोरकर, कैलास सुशिर, शेख जब्बार, सुरेंद्रा चौधरी, विजय इंगळे, सुरेंद्रा वराडे, तसेच गावकरी मंडळी प्रफुल्ल भिडे, अनंता खोंदले, विठ्ठल दिवनाले, प्रमोद दांडगे, शांताराम सुशिर, सुभाष कवळे, शेषराव दिवनाले, कृष्णा घोंगे, संकेत सुशिर तथा ग्रामपंचायत कर्मचारी संतोष बोरकर, निलेश दाभाडे, राम वानखेडे, दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी, किशोर वाकोडे आदी. मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलेश दाभाडे यांनी तर आभार प्रदर्शन संतोष बोरकर यांनी पार पाडले. कार्यक्रमाच्या निमित्ताने गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.