
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. अक्षय सध्या ‘पृथ्वीराज’ या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. ३ जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
मात्र त्याआधी १ जून रोजी गृहमंत्री अमित शहा आणि इतर केंद्रीय मंत्र्यांसाठी चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग केले जाणार आहे. आता या प्रकरणावर बॉलिवूड अभिनेता कमाल आर खानने अक्षय कुमारला टोला लगावला आहे.
केआरकेने आपल्या ट्विटरवरून हे ट्वीट केले आहे. “आता अक्की पूर्णपणे भाजपवर अवलंबून आहे. भाजप नेत्यांसाठी तो दिल्लीत पृथ्वीराज या चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग आयोजित करत आहेत. त्याला वाटतं की भाजप लोकांना त्याचा चित्रपट पाहण्यासाठी आवाहन करेल, जसे भाजपने ‘काश्मीर फाइल्स’च्या वेळी केले होते. बघूया कॅनडाचा अक्की बाला सम्राट यात यशस्वी होतो की नाही,” असे केआरके त्या ट्वीटमध्ये म्हणाला.
अक्षय कुमारने केंद्रीय मंत्र्यांसाठी चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. १ जून रोजी गृहमंत्री आणि इतर केंद्रीय मंत्री हा चित्रपट पाहणार आहेत. त्यांच्यासोबत अनेक उच्चपदस्थ अधिकारीही उपस्थित राहणार आहेत. अक्षय कुमार, मानुषी छिल्लर आणि दिग्दर्शक डॉ.चंद्रप्रकाश द्विवेदीही तिथे उपस्थित राहणार आहेत.