
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी-गोविंद पवार
लोहा शहरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यात यावा अशी मागणी छावा युवा संघटनेच्या वतीने छावा युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली पाटील पवार यांनी लोहा न.पा.चे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पुढे निवेदनात असे नमूद केले की, लोहा शहर हे राष्ट्रीय महामार्गावर व चौरस्त्यावरील वाढते शहर असून लोहा शहरात हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा लोहा न. पा. च्या वतीने बसविण्यात यावा. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे महाराष्ट्राचे भूषण आहेत. युवकांचे प्रेरणास्थान आहेत ते शूरवीर,ज्ञानी, पराक्रमी राजे होते. त्यांनी बुध्दभूषण सारखे आदी ग्रंथ लिहिले आहेत. त्यांचा लोहा शहरात अश्वारुढ पुतळा बसविल्यानंतर येणाऱ्या पिढीला व सर्व युवकांना प्रेरणा मिळेल त्यामुळे त्यांचा लोहा शहरात अश्वारुढ पुतळा बसविण्यात यावा अशी मागणी छावा युवा संघटनेच्या वतीने छावा युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली पाटील पवार यांनी लोहा न.पा.चे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.