
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -संभाजी गोसावी
कोरेगांव तालुक्यांतील करंजखोप गावचे भूमिपुत्र व सातारा जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष व माजी सभापती पंचायत कोरेगांव, ज्येष्ठ उद्योगपती आदरणीय डॉ. लालासाहेब शिंदे यांचा अभिष्टचिंतन सोहळा गुरुवारी सायंकाळी त्यांच्या सुमन गार्डन लक्ष्मी हॉल करंजखोप या निवास्थानी सोहळा मोठ्या थाटांत व उत्साहांत संपन्न. त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळा निमिंत्त करंजखोप गावांतील ग्रामस्थ माता बहिणी त्यांचे सर्व सहकारी मित्र परिवार, तसेच उत्तर कोरेगांव भागातील सर्व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मंडळी तसेच माता बहिणी मित्र परिवार व सातारा, पुणे या जिल्ह्यांतील सर्व राजकीय, सामाजिक, क्षेत्रातील मान्यवरांनी समक्ष व सोशल मीडिया वरुन शुभेच्छांचा वर्षाव करण्यांत आला. तडफदार नेते आणि उद्योगपती डॉ. लालासाहेब शिंदे यांनी आपल्या नावाचा राजकीय क्षेत्रांमध्ये त्यांनी चांगला ठसा उमटविला गेला आहे. कोरेगांव तालुक्यांतील भागांतील गोरगरीब जनतेच्या प्रश्नांला साहेबांची नेहमी साथ असते, साहेबांचे उत्तर कोरेगांव भागांतील तसेच आपल्या भूमीतील कामांना त्यांचे नेहमीच सहकार्य लाभले. साहेबांनी आपलं एक नातं, सर्व जनतेवर वेगळेच निर्माण केले आहे. अशा आपल्या लाडक्या आणि कोरेगांव तालुक्यांच्या तडफदार नेत्यांचा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या थाटांत उत्साहांत संपन्न.यावेळी करंजखोप गावचे माजी उपसरपंच मा. आनंदराव शिंदे (अण्णा) करंजखोप ग्रामपंचायतीचे सदस्य धनंजय धुमाळ (बापू) माजी सरपंच मा. संपत शिंदे,(भाऊ) अरविंद शिंदे महादेव शिंदे यांच्यासह सातारा जिल्ह्यांचे प्रतिनिधी संभाजी पुरीगोसावी यांनी आदरणीय साहेबांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या.