
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : महाविकास आघाडीची ऑफर ऐकताच फडणवीसांनी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. यासाठी चर्चा करण्याची गरज असल्याचं म्हटलं. मात्र हीच ऑफर आम्ही तुम्हाला देतो. तुम्ही विचार करा, असं फडणवीस म्हणाले. आणि त्यांनी ऑफऱ वर आणखी एक ऑफऱ देत गेम उटलवला.
यावर स्पष्टीकरण देताना, आमची दिल्लीत माणसंचं कमी असल्याचं भुजबळ म्हणाले. तुमची लोकसभेत माणसं जास्त आहेत. राज्यसभेतही संख्या मोठी आहे. त्यामुळे आम्हाला राज्यसभेची संधी द्यावी, अशी मागणी भुजबळांनी केली.
आता देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी दिल्लीता फोन फिरवला आहे. दिल्लीतून निरोप येताच पुढच्या दीड तासात दोन्ही पक्षांची पुन्हा बैठक होणार आहे. महाविकास आघाडीचे नेते देखील भुजबळ यांच्या बंगल्यावर चर्चेसाठी दाखल झाले आहेत.
आम्ही सुद्धा आमच्या नेत्यांना सांगू. तीन वाजेपर्यंत वेळ आहे. एक दीड तासाने पुन्हा बैठक होईल, असं भुजबळ माध्यमांना म्हणाले.