
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
सोनखेड,बळीरामपूर ,वाजेगाव, धनेगाव या जि.प. सर्कल वर काँग्रेसचे वर्चस्व राहणार जनतेत चर्चा
नांदेड दक्षिण चे काँग्रेसचे कर्तव्यदक्ष लोकप्रिय कार्यसम्राट आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांनी त्यांच्या मतदार संघात काँग्रेसचे वरिष्ठ नेते राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना अशोकराव चव्हाण यांच्या माध्यमातून व महाविकास आघाडी सरकार कडून शहरी व ग्रामीण भागात करोडो रुपयांचा निधी मंजूर करून आणून नांदेड दक्षिण मतदार संघात विविध विकास कामे चालू असुन यांचा प्रभाव आगामी जि.प. व पं. स. च्या निवडणूकीत पडणार असुन नांदेड दक्षिण मतदार संघातील सोनखेड, बळीरामपूर, वाजेगाव, धनेगाव या चार ही जि.प. सर्कल वर काँग्रेसचे वर्चस्व राहणार अशी चर्चा जनतेतून होत आहे.
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष मोर्चेबांधणी करीत आहेत पण नांदेड दक्षिण मध्ये काँग्रेसची चलती आहे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत व त्यांचे खंदे समर्थक असलेले आ. मोहन अण्णा हंबर्डे हे काँग्रेसचेच आहेत त्यामुळे नांदेड दक्षिण मतदार संघाचा आ. मोहन अण्णा हंबर्डे यांच्या नेतृत्वाखाली होत असुन नांदेड दक्षिण च्या विकासासाठी ते राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अशोकराव चव्हाण यांच्या माध्यमातून व महाविकास आघाडी सरकार कडून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून विविध विकास कामे त्यांनी सुरू केली आहेत.
आ. मोहन अण्णा हंबर्डे यांनी नुकतेच दि. २० मार्च २०२२रोजी नांदेड दक्षीण मतदार संघात ४३. ५८ कोटी रस्ते व पुलाच्या कामासाठी निधी मंजूर करून प्रत्येक कामाला सुरुवात केली आहे व त्या विकास कामांचे उद्घाटन व शुभारंभ आ. मोहन अण्णा हंबर्डे यांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच त्यांच्या स्थानिक आमदार निधीतून व जिल्हा नियोजन समितीच्या वतीने अनेक सिमेंट रस्त्याचे, सांस्कृतिक सभागृहाचे हिंदू स्मशानभूमीचे, मुस्लिम कब्रस्तानाचे सोनखेड सर्कल मध्ये अनेक गावात कामे झाली आहेत काही प्रगतीपथावर आहेत तसेच सोनखेड , बळीरामपूर, वाजेगाव , धनेगाव,सर्कल मध्ये अनेक गावात नागरिकांना पिण्याचे पाणी मिळावे म्हणून बोअर पाडले, शेतकऱ्यांना, नागरिकांना लाईटची व्यवस्था व्हावी म्हणून विद्युत पोल उभारलेत सोनखेड येथील तलावात डेरला लिफटचे पाणी सोडले त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी, जनावरांना पिण्यासाठी पाण्याची सोय झाली.
तसेच शेवडी बाजीराव, मधली बेटसांगवी,शिवणी जामगा येथील शेतकऱ्यांचा ऊस जळाल्यामुळे प्रत्यक्ष घटनास्थळी धाव घेऊन प्रशासनाला सोबत घेऊन पाहणी करून पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून दिली. तसेच निराधाराचे प्रश्न सोडविणे, अनेक रुग्णांना उपचारासाठी मदत करणे, कुणाचीही आडचण असेल तर कुणी कधीही फोन केला तर उचलून त्यांची समस्या सोडविणे आदी विधायक कार्य सुरू असल्यामुळे आ. मोहन अण्णा हंबर्डे यांच्या मागे मोठ्या प्रमाणात जनाधार वाढला आहे. पालकमंत्री ना.अशोकराव चव्हाण यांच्या नंतर जिल्ह्यात सर्वाधिक लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार म्हणून आ. मोहन अण्णा हंबर्डे यांना ओळखले जाते.
आगामी काळात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूका होणार आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांनी केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या विविध विकास केलीत त्यांचा जनसंपर्क प्रचंड प्रमाणात वाढला आहे दिवसेंदिवस लोकप्रियता वाढत मतदार संघातील सार्वजनिक कामाबरोबरच नागरिकांचे व्यक्तिगत कामे करणे कोरोना काळात अनेक गोरगरीबांना केलेली मदत अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचा पिकांची झालेल्या नुकसानीची पाहणी करून त्यांना नुकसान भरपाई मिळवून देणे चिखल पाण्याची पर्वा न करता प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करणे नाल्यातून जाता येत नसल्याने वेळ प्रसंगी हनुमान उडी मारणे असे अनेक विधायक कार्य सुरू असल्यामुळे संपूर्ण नांदेड दक्षिण मतदार संघात काँग्रेसमय वातावरण निर्माण झाले असुन आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत सोनखेड,बळीरामपूर, वाजेगाव , धनेगाव, या सर्कल वर काँग्रेसचे वर्चस्व राहणार आहे व काँग्रेस पक्षाचे सर्वच उमेदवार हे विजयी होतील जनता विकासाच्या व काँग्रेसच्या मागे उभी राहिल यात तीळमात्र शंका नाही अशी चर्चा जनतेतून होत आहे.