
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
व्यवसायाच्या उन्नतीसाठी डूक्करवाडी येथील महिलांना लाभ
भुम:-राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड)निसर्ग विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आंबेजोगाई व संत बाळूमामा क्षेत्र विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने डुक्करवाडी येथे महीला विकास निधी मधून डूक्करवाडी येथील महिला बचत गट यांना कुक्कटपालनाचे शेड, पिठाची चक्की, मिरची कांडप, किराणा दुकान व्यवसाय उपयुक्त उद्योग भरारी येण्यासाठी गरजूंना याचा लाभ देण्यात आला. यावेळी उपस्थित पाणलोट समिती चे अध्यक्ष श्री लवटे ग्रामपंचायत सदस्य श्री हौसेराव माने, मल्हारी सोन्नर , गोरख लवटे, शहाबुद्दीन शेख सचिव समिती सर्व महिला बचत गटाचे अध्यक्ष व सचिव सर्व सदस्य आदी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. निसर्ग विकास बहुउद्देशीय बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे श्री भास्कर जाधव, रवी गोरे सर, रणजीत पाडुळे यांनी परिश्रम घेतले.