
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी-राजेश गेडाम
भंडारा :-5 जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त असर फॉउंडेशन, भंडारा युवक बिरादरी,
इफेक्ट फोक डान्स एकादमी यांच्या वतीने पर्यावरणावर आधारित नृत्यनाट्य कलाकृती सादर करण्यात आली. वय वर्ष
5 ते 12 वर्ष वयोगटातील 25 बाल कलाकारांनी शहरातील निवडक चार ठिकाणी
“हा नाश थांबवा ” ही अप्रतिम अशी कलाकृतीतुन भंडारेकरांच्या डोळ्यात झणझणितअंजन टाकले. पृथ्वी, वायू, जल, तेज, आणि आकाश या पंचतत्वावर आधारित हा निसर्ग.
त्या निसर्गाचा समतोल मानवाने केलेल्या असंख्य चुकांमुळे ढासाळतोय आहे. वेळीच सावध झालो नाही तर येणारे संकट हे महाभयंकर राहील याची जाणीव करून देण्याकरिता वसुंधरेचे दुःख या कलाकृतीतून सादर करण्यात आले. सदर अभियान असर फॉउंडेशनच्या नियोजनात भंडारा युवक बिरादरी व इफेक्ट फोक डान्स अकादमी च्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पाडले. हे पथनाट्य अभियान वैभव कोलते,दिपक तिघरे,
विक्रम फडके,प्रणित उके यांच्या मार्गदर्शनात कलावंत
शाम्भवी तिघरे, शंतनू बोरकर, शैलधि कोलते, रजत निकुरे, मिलिंद मलेवार, सुहाना उईके, गार्गी चरडे, पवन खंडरे, संगम दडमल, पवित्रा कोलते, सौरभ बोरकर, अथर्व फडके, रेणुका मते, रोषनी हटवार, आशी अंबुलकर, अनुश्री निकुरे, तोषी मर्जीवे, कोमल उके हे सहभागी होते. तसेच या अभियानात वर्षा दाढी, सुरेंद्र कुलरकर,संजयजी एकापुरे, डॉ. अनिल निकुरे,अमृत निकुरे, योगेश पडोळे, जोसना दलाल, चेतन शहारे, वैशाली धात्रक यांनी सहकार्य करून कलावंताचे कौतुक केले. कलाकारांनी खऱ्या अर्थाने जागतिक पर्यावरण दिन साजरा केला. अभियान यशस्वीतेकरिता भंडारा पोलीस प्रशासन आणि भंडारा नगर परिषदेचे विशेष आभार