
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
नायगाव( ता मंठा)... येथील ग्रामपंचायतीने महाराष्ट्र शासनाने दिलेल्या 22 निकषाप्रमाणे कामे केली असून कोरोना मुक्त गाव पुरस्कारासाठी गटविकास अधिकारी मार्फत उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि उपआयुक्तांना आपल्या गावाचा कोविड काळात केलेल्या कामाचा लेखाजोखेचा सत्य प्रतीचा अहवाल पाठवला आहे.कोविड काळामध्ये ग्रामपंचायतीने आपले गाव शंभर टक्के कसे कोरणा मुक्त होईल यासाठी कंबर कसली होती. विविध पथकाच्या सहकाऱ्यांनी आपल्या गावातील नागरिकांचे पहिले व दुसरे लसीकरण करून घेऊन शंभर टक्के लसीकरण करणारे गाव ठरले. त्याचप्रमाणे कुटुंब सर्वेक्षण पथकाच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची माहिती गोळा करणे त्याचप्रमाणे लक्षणे असलेल्या व्यक्तींना काळजी व धीर देणे, ऑंटीजन किंवा rt-pcr टेस्ट करणे,गरोदर मातेचे व लहान बालकाचे सर्वेक्षण करणे, सकस आहार विषयी मार्गदर्शन करणे, विलगीकरण कक्ष स्थापन करणे, कोविड विषाणूंचा प्रादुर्भाव होऊ नये त्यामुळे वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे इतर उपक्रम हाती घेतले होते.,
आगामी काळामध्ये चौथ्या लाटेचा परिणाम 60 वर्षावरील वृद्ध व्यक्तींना होऊ नये या साठी बूस्टर डोस देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असे अविनाश राठोड यांनी माध्यमाशी सांगितले आहे. या डोसमुळे प्रतिकारशक्ती वाढेल आणि नागरिकांमध्ये शक्ती आणि चेतना निर्माण होईल.बूस्टर डोस साठी तालुका आरोग्य अधिकारी राठोड, लसीकरण प्रमुख एच एन ईफडे तसेच आरोग्य विभागाचे नियमित सहकार्य मिळत आहे. शासनाच्या आदेशान्वये सार्वजनिक ठिकाणी मास्क चा वापर, सोशल डिस्टंसिंग, सॅनिटायझर वापर,आती आवश्यक काम असल्यास बाहेर पडावे अन्यथा घरी रहावे असा सूचना ग्रामपंचायतीने केलेले आहेत.