
दैनिक चालू वार्ता पालघर प्रतिनिधी:-अनंता टोपले
आसे ग्रामपंचायत मधील भोवाडी गावातील पाणी टंचाई बाबत श्री प्रदीप वाघ यांनी दिली भेट.
मोखाडा:-गेल्या चार पाच दिवसा पासून वर्तमान पत्रात भोवाडी येथील पाणी टंचाई बाबत वृत्त येत होते,ही माहिती घेऊन श्री प्रदीप वाघ यांनी आज प्रत्यक्ष भेट दिली, तसेच प्रशासनाला सुचना देऊन टॅंकर टाकुन घेतले, यापुढे देखील रोज दोन टॅंकर टाकण्यात यावे अशी सुचना देखील केली.
तसेच आसे ग्रामपंचायत मधील सर्व गावपाडे हे नविन जलजीवन मिशन अंतर्गत समाविष्ट करण्यात आले असून येत्या काही दिवसांत अंतिम सर्वे केला जाणार आहे व लवकरच काम सुरू केले जाईल असे ग्रामस्थांना सांगितले.