
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी -शाम पुणेकर.
पुणे: सालाबादप्रमाणे यावर्षीही दि. ०५ जून २०२२ रोजी सकाळी ७ ते ९ या वेळेत शहरातील प्रत्येक प्रभागांत महापालिकेच्या वतीने प्लॉगेथॉनचे आयोजन करण्यात आले. महापालिका सहाय्यक आयुक्त बिबवेवाडी कार्यालय
अंतर्गत प्रभाग क्र.२८ मध्ये पोस्ट ऑफिस चौक/वखार महामंडळ चौक, मार्केटयार्ड पं.नेहरू रस्ता ते गंगाधाम ते फेडरल ऑफिस
या रूट वर प्लॉगिंग ड्राईव्ह राबविण्यात आला.
सदर प्लॉगेथॉनच्या रूट प्रमाणे मार्गावरून चालताना रस्त्यावरील प्लास्टिक/सुक्या कच-याचे संकलन केले. अनेक नागरिकांनी भाग घेतला. याप्रसंगी श्री सचिन इथापे- उपायुक्त
श्री कंदुल – मुख्य अभियंता
श्री सोनवणे – महापालिका सहाय्यक आयुक्त
व बिबवेवाडी क्षत्रीय कार्यालय वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, सर्व आरोग्य निरीक्षक, श्री विक्रम काथवटे साहेब, अतिक्रमण विभागाच्या सौ.राऊत सर्व कनिष्ठ अभियंता, लेखनिक संवर्ग
मा.नगरसेवक श्री प्रविण चोरबेले, श्री गणेश शेरला, श्री राजेंद्र सरदेशपांडे, आदि सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे संयोजन नगरसेवक रमेश बिबवे यांनी केले होते.