
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी – गोविंद पवार
अनु जाती जमाती विजा भज इमाव विमाप्र शासकीय-निमशासकीय अधिकारी–कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य मंत्रालय संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत वानखेडे यांच्या वाढदिवसानिमित्त लोहा येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना अनु जाती जमाती विजा भज इमाव विमाप्र शासकीय-निमशासकीय अधिकारी–कर्मचारी भारत वानखेडे प्रणित संघटनेचे जलसंपदा विभागाचे प्रदेशाध्यक्ष बी.बी.गायसमुद्रे यांच्या वतीने फळे वाटप करण्यात आले.
यावेळी यावेळी लोहा येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बारी, वैद्यकीय अधिकारी डॉ. लोहारे, पत्रकार विलास सावळे, विनोद महाबळे, १०८ चे चालक सिध्दार्थ ससाणे, बंटी आदी उपस्थित होते.