
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी पुणे जिल्हा- गुणाजी मोरे
येरवडा येथील जीएसटी कार्यालयात राज्य कर निरीक्षक म्हणून कार्यरत महिलेला दोन हजार रुपयांची लाच घेताना पकडले आहे. क्लिअरन्स सर्टिफिकेट देण्यासाठी लाचेची मागणी केली होती.
येरवडा येथील जीएसटी कार्यालयात राज्य कर निरीक्षक म्हणून कार्यरत महिलेला रंगेहात पडकले आहे. या महिला कर्मचाऱ्याला दोन हजार रुपयांची लाच घेताना पकडले आहे. बॅंक खाते उघडण्यासाठी क्लिअरन्स सर्टिफिकेट देण्यासाठी ही महिला लाचेची मागणी करत होती. 46 वर्षीय एका व्यक्तीने या लाचे प्रकरणी तक्रार दिली होती त्यानंतर त्या महिलेला पकडण्यात आलं. पुणे लाचलुचपत विभागाने ही कारवाई केली आहे. गुरुवारी (2 जून) दुपारी तीनच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
ज्योत्स्ना रामचंद्र कोरडे असं 35 वर्षीय भ्रष्ट महिला अधिकाऱ्याचं नाव आहे. या महिलेने बॅंक खाते उघडण्यासाठी क्लिअरन्स सर्टिफिकेट देण्यासाठी एका 46 वर्षीय व्यक्तीकडे दोन हजार रुपयांनी मागणी केली होती. आरोपी ज्योत्स्ना कोरडे ही वस्तू व सेवा कर कार्यालयात राज्य कर निरीक्षक म्हणून कार्यरत आहे. त्यांनी तक्रारदाराचे सील केलेले बँक खाते पुन्हा उघडण्यासाठी आणि पैसे काढण्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी 2,000 रुपयांची मागणी केली होती. मात्र,लाचेची रक्कम स्वीकारली जात नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती.
या सगळ्या प्रकरणाची चौकशी लातलुचपत विभागाने केली. त्यानंतर हे प्रकरण बाहेर आलं. या विभागाने आणि तक्रारदार व्यक्तीने सापळा रचला. त्यानंतर कोरडे यांना दोन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडून अटक केली. सीबीचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलिस अधिक्षक सूरज गुरव यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक ज्याेती पाटील, हवालदारअंकुश आंबेकर, हवारलदार पूजा डेरे,चंद्रकांत कदम यांच्या पथकाने ही कारवाई केली.
दरम्यान,या पु्र्वी पुण्यातील ससून रुग्णालयाच्या डॉक्टरांकडून धक्कादायक प्रकार समोर आला होता. मृत व्यक्तीचा अंतिम
अहवाल देण्यासाठी पोलिसांकडेच लाच मागितल्याचा धक्कादायक ससून रुग्णालयात घड़ला होता. डॉ. एन. पी झंझाड असे लाच मागणाऱ्या डॉक्टरचे नाव होते.