
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
एक लाखा पेक्षा जास्त मोतिबिंदू असणार्या लोकांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून दृष्टी दिली .हि सर्वसाधारण बाब नाही आणि या कार्याची दखल घेऊन भारत सरकारने देशातील उत्कृष्ट कामगिरी बद्दल चा बहुमान असनाणार पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले . तसेच महाराष्ट्र सह देशात ज्यांची दृष्टी दुत म्हणून ओळख आहे असे महान व्यक्तिमत्त्व डॉक्टर तात्याराव लहाने साहेब .
ज्ञान प्राप्त करणे आणि प्राप्त केलेला ज्ञान नम्रपणे कुठल्याही प्रकारचा मी पणा गर्व अहंकार न करता निस्वार्थी पणे लोककल्याणासाठी समर्पित करण खूप कमी लोकांना जमत.ते म्हणजे अशा खूप कमी आणि खास लोकांपैकी एक महान नेतृत्व म्हणजे डॉक्टर तात्याराव लहाने ज्यांना आपण अनेकांना दृष्टी देणारे देवदूत म्हटलं तरी वावगे ठरणार नाही. दृष्टी हि सृष्टी पाहण्याची सर्वतम व्यवस्था आहे. दृष्टी जर व्यवस्थित असेल तर पृथ्वीवरील सर्व प्रकारचे सौंदर्य चांगल्या वाईट बाबी पाहता येतात अनुभवता येतात . दृष्टी चे रक्षण करण्यासाठी आणि अनेकांना दृष्टी देण्यासाठी अनेक नामवंत तज्ञ डॉक्टर कार्यरत असतात परंतु या पैकी डॉक्टर तात्याराव लहाने यांनी आपल्या कारकीर्दीत लाखो लोकांच्या डोळयावर योग्य शस्त्रक्रिया करून त्यांना यशस्वी दृष्टी प्रदान केली. लातूर जिल्ह्यातील माकेगाव जे लातुर व बीड च्या सीमेवर आहे .या छोट्याशा खेडेगावात डॉक्टर तात्याराव लहाने यांचा जन्म झाला कौटुंबिक परिस्थिती बेताचीच होती प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण खूप कठीण आणि संघर्षमय परिस्थितीत पूर्ण झालं. शिक्षण पूर्ण करत असताना परिस्थिती बेताची असल्याने वेळप्रसंगी मजुरीही करावी लागली. परंतु दैदिप्यमान इच्छाशक्ती आणि जीवनामध्ये काहीतरी घडण्याची स्वप्न उराशी बाळगून प्रवास करणारे दिग्गज संघर्षाला संकटाला घाबरत नसतात .त्याच पद्धतीने डॉक्टर तात्याराव लहाने साहेब यांनी संघर्षातून आपलं शिक्षण पूर्ण करून डॉक्टर झाले. दरम्यानच्या काळात जे जे हॉस्पिटल मुंबई येथे अधिष्ठाता पदाची जबाबदारी त्यांना मिळाली , तसेच ते उच्च कोटीचे नेत्र तज्ञ असल्याने वैद्यकीय क्षेत्रात त्यांचं एक वेगळा नावलौकिक झाला होत. मात्र त्यांनी आपल्या पदाचा आणि ज्ञानाचा वापर हा पैसे आणि प्रतिष्ठा कमावण्यासाठी न करता लोककल्याणासाठी केला अविरत जनसेवेचा वसा आणि वारसा खांद्यावर घेऊन जनसेवा करत असताना दिवस-रात्र सुट्टी कार्यालयीन वेळ संपली असं कधीही पाहिलं नाही. उलट नियमित सोळा सतरा कधी कधी तर अठरा आणि आवश्यकता वाटली तर तेविस तास हि अतिशयोक्ती नाही तर वास्तविक सत्य आहे कुठल्याही जागतिक विक्रमा पेक्षा मोठी तपश्चर्या आहे . आपल्या जीवनातील जास्तीत जास्त कालावधी हा लोक कल्याणासाठी कसा समर्पित करता येईल. आणि आपण लोक उपयोगी कसे ठरू हाच उदात्त दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून अनेक लोकांना दृष्टी देण्यासाठी प्रयत्न केले . आज जागतिक दृष्टी दिन आहे त्यानिमित्ताने अनेकांना दृष्टी देणारे देवदूत दृष्टी दूत डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या कार्याला सलाम आणि जागतिक दृष्टी दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा .
गणेश खाडे
संस्थापक वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बाल संस्कार शिबिर आध्यात्मिक मार्गदर्शक 9011634301