
दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी – माधव गोटमवाड
गत वर्षी कोरोणाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढले असल्याने देशभरात लॉकडाऊन लावण्यात आले होते. या लॉकडाऊन मध्ये सर्वात जास्त नुकसान विद्यार्थ्यांचे झाली दहावीच्या आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आले होते.पण चालु वर्षात कोरोणाचा प्रादुर्भाव नसल्यामुळे परिक्षा मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पध्दतीने घेण्याचं निर्णय घेतला.विध्यार्थीयांची मानसिकता पहाता पालक वर्गातुन चिंता व्यक्त करण्यात येत होती. परिक्षा यशस्वी होण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आले होते.
लातूर बोर्डाकडून घेण्यात आलेल्या मार्च – एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी बोर्ड परीक्षेत शेकापूर येथील महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल हा 100% लागला आसुन एकुन विध्यार्थी परीक्षेत हे 271 पैकी 271 उतिर्ण झाले आहेत.तर विषेश प्राविण्य मध्ये 266 उतिर्ण झाले तर 05 विध्यार्थां प्रथम श्रेणी मध्ये उतिर्ण झाले पण महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल हा दरवर्शी प्रमाणे याही वर्षी यशाची पंरमपरा कायमच राहीली आहे.
सर्व गुनवंत विध्यार्थांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व माजी जिल्हा परीषद सदस्य मा.सांभाजीराव पाटील केंद्रे व संस्थेचे सचिव व शेकापूर नगरीचे सरपंच शिवाजीराव पाटील केंद्रे , प्राचार्य मोतिभाऊ केंद्रे ,पर्यवेक्षक वसंतराव केंद्रे यांनी गुणवंत विध्यार्थांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
विद्यालयातील बारावी विज्ञान शाखेतून १५६ पैकी १५६ विद्यार्थी उतीर्ण झाले. या शाखेचा निकाल १०० टक्के लागला असून या शाखेतून कु. पूनम लक्ष्मण केंद्रे ८२.५० टक्के, कु. वर्ष प्रफुल कदम ८२.१७ टक्के, कु. जयश्री संजय पवार ८१.३३ टक्के यांनी गुणानुक्रमे प्रथम , द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला आहे. अशी माहिती शाळेकडून देण्यात आली.
विद्यालयातील बारावी कला शाखेचा ७० पैकी ७० विद्यार्थी उतीर्ण झाले. सदरील शाखेचा १०० टक्के निकाल लागला असून या शाखेतून कु. वैष्णवी प्रभाकर गायकवाड ८३.५० टक्के, गणपती परशुराम मुंडे ८३.०० टक्के, कु. अंजली तिरुपती घुगे ८१.८३ टक्के यांनी गुणानुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला आहे .
वाणिज्य शाखेतून ४५ पैकी ४५ विद्यार्थी उतीर्ण झाले. वाणिज्य शाखेच्या निकाल १०० टक्के लागला आहे. या शाखेतून कु. गंगासागर नंदकिशोर केंद्रे ७८.५० टक्के, कु. निकिता ज्ञानोबा केंद्रे ७६.५० टक्के, पुंडलीक रूकमाजी गित्ते ७६.३० टक्के) यांनी गुणानुक्रमे प्रथम , द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला आहे.अशी माहिती शाळेकडून देण्यात आली.
या वेळी परीक्षा विभाग प्रमुख प्रा. गोविंद आडे, संस्कृतीक विभाग प्रमुख रामराव वरपडे, विषय शिक्षक प्रा.अरुण केदार, प्रा.सूर्यकांत गुट्टे, प्रा. देविदास जयभाये, प्रा.भारतलाल सुर्यवंशी, प्रा. गिरीश नागरगोजे, प्रा. मोतीराम नगरगोजे, मोहित केंद्रे, व्यंकट पुरमवार, अमित लोंड, एस.पी केंद्रे ,संभु वाघमारे ,मुकेश केंद्रे यांच्याह विद्यालयातील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी गुणवंत विध्यार्थांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.