
दैनिक चालु वार्ता नांदुरा प्रतिनिधी- किशोर वाकोडे
देवधाबा: दि.११.मलकापूर मतदार संघाचे आमदार राजेश एकडे यांच्या अथक व सततच्या पाठपुराव्यामुळे मलकापूर तालुक्यातील देवधाबा येथील धनगर समाज बांधवांना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेच्या माध्यमातून सुमारे ६० लाभार्थ्यांना घरे बांधून देण्याकरिता सुमारे १ कोटी ६० लाख ३२ हजार ८०० रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
मौजे देवधाबा येथे महाराष्ट्र राज्याचे बहुजन विकास समाज कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी विकास कार्याची दखल घेत या चालू वर्षात मलकापूर मतदार संघातील धनगर समाज बांधवासाठी एकूण तीनशे घरे मंजूर करून देणार असे जाहीर केले. व पुढील काळात मलकापूर मतदार संघात धनगर समाज बांधवांसाठी एक हजार घरे मंजूर करून देणार असे सांगितले. यावेळी घरकुल लाभार्थी यांच्यासह असंख्य मान्यवर व ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते.