दैनिक चालू वार्ता नांदुरा प्रतिनिधी- किशोर वाकोडे
मलकापूर: दि.११.सन २०१०पासून प्रख्यात उद्योजक श्री. डी. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखाली, लोकसेवा शिक्षण संस्थेचे चे सचिव डॉ. अरविंद कोलते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या पदमश्री डॉ. व्ही. बी. कोलते महाविद्यालयातील पोलिटेक्निक मधील काम्पुटर, इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल या तिनही शाखांना एनबीए मूल्यांकन नुकतेच प्राप्त झाले व या मूल्यकांनाची वैधता ही ३०जून २०२५ पर्यंत आहे. विदर्भ व खान्देश मध्ये एनबीए नामांकन असलेले एकमेव खाजगी कोलते महाविद्यालय आहे. अशी माहिती संस्थेचे सचिव डॉ. अरविंद कोलते यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
महाविद्यालयाला एनबीए मान्यता मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे लाभ मिळतात. संपूर्ण शिक्षणाची कायदेशीर व बंधनकारक बळकटी होते. संस्थेबाबत विश्वासहर्ता वाढून संगोपन व उत्तेजन दिले जाते. मनातील भीती कमी करून त्यांना धैर्याने पुढे जाऊन नोकरीच्या संधी उपलब्ध केल्या जातात. विद्यार्थ्यांची कार्यक्षमता बळकट केल्या जाते. महाविद्यालयाला इतर संस्थांकडून अनुदान प्राप्त होते. विद्यार्थ्यांना गतिशील शिक्षणाची जोड प्रदान केले जाते. नियमित कामाच्या पद्धती सुधारणा होते. उद्योजकांना आपल्या संस्थेकडे आकर्षित केले जाते. महाविद्यालय या बाबतचा विश्वासहर्ता संदेश जनमानसात पसरतो. अतिरिक्त प्राध्यापकांच्या योगदानामुळे चांगले परिणाम मिळण्याची शाश्वती मिळते. कंपन्यांसोबत औद्योगिक करार कायमस्वरूपी होतो. अशी माहिती महाविद्यालयाचे चेअरमन श्री. डी. एन. पाटील यांनी दिली.
महाविद्यालयामध्ये अभियांत्रिकीमधील ४ पदवी अभ्यासक्रम ३ पदवीत्तर अभ्यासक्रम तसेच ३ पदविका अभ्यासक्रम सुरु असून, प्रथम वर्षाची प्रवेश क्षमता ४०० आहे. महाविद्यालयातील सर्व सोयींनी युक्त इमारती व प्रयोगशाळा, उच्च विद्याविभूषित शिक्षक वृंद, उत्कृष्ट निकालाची परंपरा, प्रशस्त व अद्ययावत ग्रंथालय ही महाविद्यालाची वैशिष्टे आहेत. चालू वर्षात आयोजित कॅम्पस महाविद्यालयातील ९० टक्के्यांच्या वर विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय कंपन्यामध्ये आकर्षक पॅकेज वर प्लेसमेंट झाली आहे. महाविद्यालयाने आंतराष्ट्रीय दर्जाचे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स व जिमखाना सुरु केला आहे. महाविद्यालयात राष्ट्रीय पातळीवरील उन्नत भारत अभियान, एनएसएस व एनसीसी कार्यरतआहे. गेल्या ३ वर्षा अगोदर महाविद्यालयातील पदवी अभ्यासक्रमाला नॅककडून उच्च दर्जा मिळाला आहे. महाविद्यालयाला संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे निरंतर संलग्नीकरण आहे. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अनिल खर्चे यांनी दिली.
विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व रोजगाराभिमुख शिक्षण पद्धती शिक्षण पद्धती यावर आम्ही नेहमी भर देतो. विद्यार्थ्यांचे वेगवेगळ्या पद्धतीने वर्षभर मूल्यमापन केले जाते. लेखी परीक्षा, प्रश्न मंजुषा, मिनी प्रोजेक्ट, प्रेसेंटेशन, तोंडी परीक्षा या पद्धतीचा अवलंब करून आपली शाखेच्या अभ्यासक्रमाबरोबर विद्यार्थ्याला दुसऱ्या शाखेमधील काही विषय शिकण्याची इच्छा असल्यास तशी परवानगी मिळते. महाविद्यालयातील तज्ञ प्राध्यापक, नामांकित उद्योजकांचे मार्गदर्शन घेत असतात. या मुळे आमचा विद्यार्थी बाहेरील जगाशी जोडला गेला. याबाबतचे विचार व महाविद्यालयाच्या कार्याची माहिती महाविद्यालयाचे प्रशासकीय डीन डॉ. युगेश खर्चे यांनी यावेळी थोडक्यात सांगितली.
कोलते महाविद्यालयाने शैक्षणिक कार्यक्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. असे वक्तव्य मलकापूर नांदुरा मतदार संघांचे आमदार मा. राजेश एकडे यांनी केले व महाविद्यालयाला मिळालेल्या एनबीए मूल्यांकन बद्दल महाविद्यालयातील सर्व स्टाफ चे अभिनंदन केले. सोबतच महाविद्यालयाचे उपाध्यक्ष प्रसिद्ध उद्योजक श्री. प्रदीपभाऊ कोलते, महाविद्यालयाचे खजिनदार श्री.सुधीर पाचपांडे, सदस्य श्री. देवेंद्र पाटील, श्री.अनिल इंगळे या सर्वांनी महाविद्यालयाच्या या दर्जेदार कामगिरीबद्दल प्राचार्य डॉ. अनिल खर्चे, प्रशासकीय डीन डॉ. युगेश खर्चे, महाविद्यालयीन एनबीए कोऑर्डिनेटर प्रा. रमाकांत चौधरी, पॉलीटेक्निक विभागाचे इन्चार्ज प्रा. संदीप खाचणे, अकॅडमिक डीन प्रा. नितीन खर्चे सह सर्व विभाग प्रमुख व सर्व स्टाफ चे अभिनंदन केले व त्यांना शुभेच्छा दिल्या.
