
दैनिक चालु वार्ता शिरपूर प्रतिनिधी:- महेंद्र ढिवरे
अटारी पुणे झोन- VIII, महात्मा फुले कृषी विद्यापीठ कृषी विज्ञान केंद्र, धुळे अंतर्गत मा. कुलगुरू डॉ.प्रशांतकुमार पाटील, मफुकृवी राहुरी यांच्या संकल्पनेतून कृषि पारायणाची सुरवात झिरवे,ता.सिंधखेडा या गावामध्ये करण्यात आली. सदर पारायण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी.डॉ. चिंतामणी देवकर, सहयोगी अधिष्ठाता, कृषि महाविद्यालय, धुळे हे होते तसेच व्यासपीठावर प्रमुख उपस्थितीमध्ये सौ. अनिताताई पाटील,सरपंच,झिरवे , डॉ.दिनेश नांद्रे, कार्यक्रम समन्वयक, प्रा. श्रीधर देसले, उद्यानविद्या वेत्ता, डॉ. पंकज पाटील, शास्त्रज्ञ, पिक सरंक्षण,कृषि विज्ञान केंद्र, धुळे, कु.अमृता राउत, शास्त्रज्ञ, कृषि अभियांत्रिकी प्रक्रिया, कृषि विज्ञान केंद्र, धुळे, डॉ.धनराज चौधरी, शास्त्रज्ञ,पशु विज्ञान व दुग्ध शास्त्र, कृषि विज्ञान केंद्र, धुळे, श्री.विनय बोरसे तालुका कृषि अधिकारी,सिंधखेडा, श्री. नावनाथ साबळे, मंडळ कृषि अधिकारी, श्री.वाघ, श्री.बोरसे, श्री.योगेश पाटील, श्री.चेतन पाटील, प्रगतशील शेतकरी आदी मान्यवर उपस्थित होते.
या पारायणाचे प्रास्ताविक डॉ. दिनेश नांद्रे यांनी केले, प्रास्तविका मध्ये त्यांनी कृषि पारायण कार्यक्रमाचा उद्देश, महत्व उपस्थित शेतकरी, महिला यांना अवगत करून दिले. तसेच शेतकरी शास्त्रज्ञ सुसावंदाचे महत्व अधोरेखित करून कृषि विज्ञान केंद्र भविष्यात पारायणाच्या माध्यमातून राबिविल्या जाणाऱ्या उपक्रमाविषयी माहिती देत, यात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी, महिलांनी, ग्रामीण युवकांनी सहभाग नोंदवत कृषि उत्पादन खर्च कमी करून शाश्वत उत्पादनाकडे वाटचाल करावी असे आव्हान केले.
श्री.विनय बोरसे यांनी कृषि विभागाच्या विविध योजना विषयी माहिती उपस्थित शेतकरी, महिला वर्गाला करून देत कापूस पिकामधील एक पिक एक वाण या योजने वर भर देत उपस्थितांना मार्गदर्शन केले, यात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा असे आव्हान केले.
तांत्रिक मार्गदर्शना मध्ये डॉ. पंकज पाटील यांनी कापूस पिकातील एकात्मिक कीड व रोग निदान या वर प्रकाश टाकत, रासायनिक कीटक नाशके यावरील खर्च कसा कमी करता येईल याविषयी मार्गदर्शन केले. डॉ धनराज चौधरी यांनी पशुपालानातील चारा पिंकाचे महत्व अधोरेखित करून उपस्थितांना मार्गदर्शन केले.प्रा.श्रीधर देसले, यांनी भाजीपाल पिंकाचे लागवड तंत्र याविषयीची माहिती उपस्थितांना दिली.श्री.जगदीश काथेपुरी यांनी सुधारित कापूस लागवड तंत्रज्ञान, श्री. रोहित कडू यांनी सुधारित कांदा लागवड तंत्रयाविषयी, कु.अमृता राउत यांनी ग्राम स्तरावरील कृषि प्रक्रियेच्या संधी तर डॉ.अतिश पाटील यांनी माती पाणी परीक्षणाचे महत्व अधोरेखित करून मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय मार्गदर्शनामध्ये डॉ.चिंतामणी देवकर यांनी कृषि पारायणाचे महत्व सांगत शेतकऱ्यांनी रासायनिक निविष्टांचा वापर कमी करत सेंद्रिय शेती सोबतच विषमुक्त शेतीच्या दृष्टीने वाटचाल करणे आवश्यक आहे असे सांगितले. यामध्ये शेतकऱ्यांनी रासायनिक कीटकनाशका एवजी जैविक कीटकनाशके, जैविक खते इ. वापर केल्यास उत्पादनात वाढ होऊन पर्यावरण पूरक शेती होण्यास मदत होणार आहे. तसेच तरुणांनी शाश्वत शेती उत्पादनाकरीता शेती बरोबर कृषि पूरक व्यवसाय, प्रक्रिया उद्योगाकडे वाटचाल करणे आवश्यक आहे.
या मेळाव्याचे संपूर्ण संचालन डॉ.धनराज चौधरी यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री.बोरसे यांनी मानले. कृषि पारायण यशस्विते साठी झिरवे गावचे सरपंच, नागरिक, श्री. योगेश पाटील, श्री.चेतन पाटील आणि कृषि विज्ञान केंद्राचे अधिकारी, कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.