
दैनिक चालू वार्ता कोल्हापूर प्रतिनिधी -शहाबाज मुजावर,
राज्य निवडणूक आयोग आणि जिल्हाधिकारी यांच्याकडून आलेल्या आदेशानुसार पन्हाळा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम सोमवार पन्हाळा येथे संपन्न झाला. यामध्ये प्रभागांची रचना करण्यात आली.यामध्ये एकूण १० प्रभाग असून, २० नगरसेवक असणार आहेत. तर २० पैकी १० नगरसेवक महिला असणार आहेत. अनुसूचित जातीसाठी सर्वसाधारण गटात ३ जागा आरक्षित राहणार असून अनुसूचित जाती महिलांसाठी ३ जागा आरक्षित असणार आहेत. यामुळे खुल्या गटात ८ महिला नगरसेवकपदावर विराजमान होणार आहेत. पन्हाळ्याची एकूण लोकसंख्या ३,१२१ असून, अनुसूचित जाती लोकसंख्या ४२७ व अनुसूचित जमातीची लोकसंख्या ३९ आहे. तर जाहीर झालेल्या अंतिम प्रभागानुसार– प्रभाग १, हा राजदिंडी परिसरात सुरू होत असून बालग्राम भोपाची तिकटीपर्यंत विस्तारला आहे. या प्रभागामध्ये एकूण लोकसंख्या ३३१ इतकी आहे. यामध्ये आरक्षण एक अ अनुसूचित जाती महिला, एक ब सर्वसाधारण असा असून अनुसूचित जातीची लोकसंख्या ३६ आहे. प्रभाग २, कदम बोळ, शिंगे गल्ली येथून लाड घरापर्यंत आहे. याची लोकसंख्या २९३ आहे. यात अनुसूचित जातीचे २ व अनुसूचित जमाती लोकसंख्या सर्वसाधारण आहे. ३३ इतकी आहे.आरक्षण दोन अ सर्वसाधारण महिला दोन ब सर्वसाधारण — प्रभाग ३ पुसाटी बुरुज, गायकवाड वाडा येथून भोसले गल्ली, मयूर उद्यान, अंबरखानामार्गे अवकाश केंद्रांपर्यंत आहे. या प्रभागात अनुसूचित जातीची आहे. २८३ लोकसंख्या आहे. पैकी अनुसूचित जातीची लोकसंख्या१८आहेत. आरक्षण तीन अ सर्वसाधारण महिला तीन ब सर्वसाधारण — प्रभाग ४ मध्ये मधली गल्ली, तहसीलदार कार्यालय, धर्मकोठी ते आठवडा बाजार परिसर आहे. या ठिकाणी ३३९ लोकसंख्या आहे. यात अनुसूचित जातीचे ९ आणि अनुसुचित जमातीचे ६ लोक आहेत. आरक्षण चार अ सर्वसाधारण महिला चार ब सर्वसाधारण — प्रभाग ५ मध्ये, सोमेश्वर तलाव ते प्रांत कार्यालय परिसर आहे. येथे २९४ लोकसख्या आहे. यामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या २७ आहे.आरक्षण पाच अ सर्वसाधारण महिला पाच ब सर्वसाधारण प्रभाग ६ मध्ये, कन्या विद्यामंदिर, मेडशिंग बोळ, काशीद गल्ली, बाराईमाम दर्गा परिसर आहे. या ठिकाणी २९४ लोकसंख्या आहे. यामध्ये २७ लोकसंख्या अनुसूचित जातीची आहे. आरक्षण सहा अ सर्वसाधारण महिला सहा ब सर्वसाधारण आहे.प्रभाग ७ हा, महाजन बोळ, व्यापारी पेठ मुख्य रस्ता परिसर असून लोकसंख्या ३३५ आहे. यात ४१ लोकसंख्या अनुसूचित आहेत. आरक्षण सात अ अनुसूचित जाती सर्वसाधारण सात ब सर्वसाधारण महिला आहेत. प्रभाग ८ मध्ये तीन दरवाजा परिसर ते बाजीप्रभू पुतळा परिसराचा समावेश असून, यामधील लोकसंख्या २९३ आहे. पैकी २६१ लोकसंख्या अनुसूचित जातीची आहे, तर ३२ लोकसंख्या आरक्षण आठ अ अनुसूचित जाती महिला आठ ब सर्वसाधारण असून प्रभाग ९ हा भालदार बोळ, फारस बोळ, गोलंदाज बोळ, गारदी बोळ असा असून या प्रभागात लोकसंख्या ३४७ आहे. यामध्ये २ लोकसंख्या अनुसुचित जमातीची आहे. आरक्षण नऊ अ सर्वसाधारण महिला नऊ ब सर्वसाधारण — प्रभाग १० हा पावनगडापासून सुरू होऊन पराशर गुहा, काली बुरुज, सदोबा दर्गा परिसर सि.स.नं. ४६८ पर्यंत आहे. यामध्ये ३१२ लोकसंख्या असून, यामध्ये लोकसंख्या अनुसूचित जातीची आहे. आरक्षण दहा अ सर्वसाधारण महिला, दहा ब सर्वसाधारण राहिला आहे.