
दैनिक चालू वार्ता मुखेड तालुका प्रतिनिधी- संघरक्षित गायकवाड
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा हिंदु जननायक सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज दिनांक १४जून २०२२रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका मुखेडच्या वतीने शासकीय रुग्णालयात येथे फळवाटप कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते व शासकीय रुग्णालयात गरोदर मातेस व आजारी असणाऱ्या व्यक्तीस फळ वाटप करण्यात आले. मुखेड तालुक्यातील व शहरातील अनेक महाराष्ट्र सैनिकांनी सर्वांनी मिळून उपस्थित रुग्णालयात गरोदर माता व रुग्णांसाठी मोठ्या प्रमाणात फळ वाटप करण्यात आले राजसाहेबांप्रती असलेले प्रेम व्यक्त करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला.
यावेळी मनसे.ता अध्यक्ष संतोष बनसोडे, डॉ टास्कळे साहेब,हरिदास दिंडे तालुकाध्यक्ष मनसे शेतकरी सेना,बंटी कांबळे,कैलास बनसोडे, गजानन मामिलवाड, केतन बनसोडे,आदि मान्यवर व मनसे सैनिक उपस्थित होते.