
दैनिक चालू वार्ता पेनुर प्रतिनिधी- राम कराळे
लोहा: कृषि विभागाच्या स्मार्ट मा.बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामिण परिवर्तन (स्मार्ट)प्रकलप (जागतिक बॅक सहाय्यित उपक्रम) आत्मा लोहा अंतर्गत स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत असावरी शेतकरी उत्पादक कंपनी धानोरा.म.ता.लोहा. येथे मुल्य साखळी विकास शाळा पिक सोयाबीन शेतीशाळेमध्ये सोयाबीन पिक शेतीशाळेच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले आहे .कृषि विभागाच्या धोरणानुसार सोयाबीन पिकांमध्ये शेतक-यांना प्रत्यक्ष शेतावर सोयाबीन पिकातील विविध अवस्थेमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी सोयाबीन शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
लोहा तालुक्यातील खरीप हंगामात कापुस,पिकासोबत बहुतांश शेतकरी सोयाबीन पीक लागवडीला महत्त्व देतात.यांच अनुषंगाने कृषि विभागाच्या वतीने रविशंकर चलवदे प्रकल्प संचालक नांदेड , श्रीमती माधुरी सोनवणे प्रकल्प उपसंचालक , अरुण घुमनवाड तालुका कृषि अधिकारी लोहा, यांच्या तसेच यांच्या मार्गदर्शनाखाली आत्माचे सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक सोहेल सय्यद यांनी मौजे धानोरा म. येथे शेतीशाळेचे आयोजन केले आहे.
स्मार्ट अंतर्गत आयोजन : सोयाबीन पिकाविषयी एकूण पाच सत्र शेतीशाळेमध्ये घेण्यात येणार आहेत यामध्ये १) पेरणीपूर्व २) पेरणी व रोपावस्था, ३) शाखीय वाढ व फुलोरावस्था,४)शेंगा लागणे व पक्वता, ५)काढणी व काढणीपश्यात तंत्रज्ञान, प्रतवारी व साठवणूक, प्रक्रिया उद्योग विक्री व्यवस्था याबाबत माहिती दिली जाणार आहे.व पहिले सत्र आयोजित झाले या मध्ये*
शेतीशाळेत निवडलेले शेतकर्यांचे सभेत शेतीशाळेचा उद्देश, सोयाबीन उत्पादनात येणाऱ्या सर्वसाधारण अडचणी यावर शेतकर्यांची निवड,बीजप्रक्रिया,बियाणे उगवण क्षमता चाचणी,महिलांचा शेतिविषयी निर्णय़ प्रकीया व प्रत्यक्ष कामातील सहभाग व बि.बी.एफ. पद्धतीने पेरणी, सरी वरंब्यावर पेरणी,ठिबक/तुषार सिचंनाचा वापर या विषयावर शेतीशाळा प्रशिक्षक मन्मथ गवळी,बि.ए.एस.एफ कंपनीचे शंकर नव्हाते,राजेश काळे, कृ.स.सुप्रिया बिरादार मॅडम, मोटारे पो्करा सहायक यां सर्वानी मार्गदर्शन केले.
यावेळी आत्माचे सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक सोहेल सय्यद यांनी शेतकऱ्यांनी खरीप हंगामात सोयाबीन बियाणांच्या पेरणीबाबत घाई करु नये. यासाठी शेतकऱ्यांनी 75 ते 100 मि.मी. पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी, असे आवाहन केले आहे. येणाऱ्या पुढच्या सत्रबाबत माहिती दिली.
या शेतीशाळेस धानोरा म. येथील सौ.लक्ष्मीबाई पिपळपळे,कलुबाई चव्हाण,गगंबाई राठोड, लक्ष्मीबाई गिते,व श्री.पवन पिपळपळे, गोविद राठोड, संभा मदेलवाड,मारोती मदेलवाड इतर महिला शेतकरी व शेतकरी सदस्य उपस्थित होते.