
दैनिक चालू वार्ता गंगापूर प्रतिनिधी-सुनिल झिंजूर्डे पाटिल
गंगापूर तालुक्यातील शिंगी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज दि 15 रोजी दुसरा प्रवेशोत्सव मेळावा साजरा करण्यात आला होता.या निमित्ताने प्रभात फेरी पुस्तकांचे वाटप करून सर्व विध्यार्थ्यांना मिटाइचे वाटप करण्यात आले.व संत तुकाराम विद्यालय येथे नव्याने रुजू झालेले मुख्याध्यापक श्री प्रमोद सोनवणे सर यांचा शाल, नारळ, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला, यावेळी केंद्र प्रमुख अशोक राऊत सर,शालेय व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष रवींद्र जाधव, सरपंच पती गणेश कारभार, उपसरपंच आयुब पटेल, भगवान तिखे पोलीस पाटिल,सुनिल झिंजूर्डे पाटिल पत्रकार,भाऊसाहेब वाघ,आप्पासाहेब कारभार,कैलास बाडगुले,अनिस पटेल, शाहेद पटेल,हरकळ सर, काकडे सर, बनकर सर,मंगल जाधव (सोनवणे)मॅडम, ताराबाई झिंजूर्डे, नर्गिस पठाण,योगिता जाधव,कांताबाई वाघ यांच्यासह असंख्य पालक उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी दिलीप आळंजकर सर,सतीश कबाडे सर,किशोर भोसले सर,विजयकुमार सोनवणे सर,राजाराम कापडी सर,विमल इखे,सुनीता पवळ, योगिता पदीर,अर्चना नरवडे आदींनी परिश्रम घेतले.