
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
जीवनातील एक क्षण होत्याच नव्हत करत असतो .सुख, दुःख चांगला वाईट कालावधी ,चांगली वाईट वेळ हे सगळं नैसर्गिक आहे ते विहीत कालावधीत येणार आणि जाणार परंतु वेळ वाईट असली ,संकटांची असली आणि सल्लागार योग्य असेल तर आपण उभा राहणार या मध्ये शंका नाही पण उलट सल्लागार चुकीचा लाभला तर वाईट वेळेत मानुस संपण्याच्या दिशेने प्रवास करतो .या उलटं चांगली वेळ असली आणि सल्लागार चुकीचा लाभला तर तो चांगल्या वेळेला सुद्धा आपला प्रवास संपवण्याच्या दिशेने घेऊन जाते उलट चांगल्या वेळेत योग्य सल्लागार असेल तर आहे या पेक्षा हि आपण आपण यशोशिखरावर जातो . यशोशिखरावर असणारा जमिनीवर आला कि सल्लागार चुकीचा लाभला हे गणितच आहे .
काही क्षणात अति उच्च शिखरावर असणारा व्यक्ती रस्त्यावर आणण्याचा महान कार्य फक्त अयोग्य सल्लागार च करू शकतो.तसेच सर्वसाधारण व्यक्तिला अति उच्च शिखरावर पोहचविण्यासाठी सुद्धा योग्य सल्लागार खुप मोठी भुमिका आदा करतो . एकंदरीत जसा आपला सल्लागार आहे तसंच आपलं आयुष्य आणि भविष्या घडत मग ते उज्ज्वल असो कि खडतर असो . सल्लागार हाच किंगमेकर असतो .अगदी पुरातन काळापासून अस्तित्वात असलेल्या मानवी व्यवस्थेचं आपण बारकाईने निरीक्षण केले तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते .ती म्हणजे राजा असो ,कि महाराजा असो ऋषी असो कि मुनी असो किंवा सर्वसाधारण मानव सल्लागार हि युगा युगाची परंपरा आहे. आपलं व्यवस्थित समाधानी जीवन एका सल्याने बिघडु शकत आणि बिघडलेल जीवन एका सल्याने व्यवस्थित होऊ शकत एकंदरीत सल्ला आणि सल्लागार कसे यावरच सगळं अवलंबून असतं.थोडक्यात आपल्या जीवनाच्या गाडीचा चालक म्हणजे च सल्लागार आणि चालक जर सुयोग्य सुसंस्कृत, प्रभावी , निपुण, सर्व गुणसंपन्न, चाणक्य, यथा योग्य असेल तर कसल्याही उचित अनुचित परस्थिती वर आपण मात करून शकतो . म्हणून जीवनातील सल्लागार खुप महत्वपूर्ण आहे.
श्री कृष्णा सारखा सल्लागार मिळाला म्हणून नगण्य अशा संख्या बळावर सुद्धा पांडव विशालकाय संकाटावर मात करत करत यशस्वी झाले . जीवनाच्या वाटेवर चालत असताना आपला प्रवास किती खडतर किंवा सुखकर आहे याच मुल्यमापन आपला सल्लागार सुयोग्य आहे अयोग्य आहे यावरच अवलंबून असतं .म्हणून योग्य सल्लागार हा परम भाग्यने मिळते . जीवन मध्ये जर आपल्याला कुठल्याही क्षेत्रात जसं कला, क्रीडा ,संस्कृती, खेळ ,साहित्य ,उद्योग, रोजगार, स्वयंरोजगार, अध्यात्म ,समाजकारण, राजकारण, व्यवसाय, नोकरी तसेच सामाजिक जीवन या सर्व क्षेत्रात आपल्यला झेप घेयची असेल आणि आपण साधारण व्यक्ती असो कि सेलिब्रिटी असो याठिकाणी पोहचण्यासाठी सल्लागार हा आवश्यक असतोच . अपवादात्मक परिस्थितीत काही लोक स्वकर्तुत्वाने पुढे आलेले असतात त्यांना सल्लागार यांची आवश्यकता जाणवतं नाही मात्र असे लोक नाममात्र असतात बहुतांश लोकांना सल्लागार हा आवश्यक असतोच काही मोजक्या लोकांच्या अपवाद वगळला तर प्रत्येकाला आपल्यला जीवनात मार्गक्रमण करत असताना सल्लागार आवश्यक असतोच पण तो सल्लागार जर योग्य लाभला तर निश्चितच आपण कुठेही अडचणीत येणार नाही,संकटात , सापडणार नाही किंवा कुठल्याही संकटातुन योग्य मार्ग काढत आपण योग्य ठिकाणी पोहचु शकतो .तर सल्लागार चुकीचा मिळाला तर मग मात्र आपल्या जीवनात होत्याच नव्हत झाल्याशिवाय राहणार नाही.विषय लहान असो कि मोठा समस्या गंभीर असो कि सर्वसाधारण अंत्यत कमी लोक स्व विवेकावरून निर्णय घेतात . परंतु बाहुतांश लोकांना निर्णय घेण्यासाठी सल्लागाराची आवश्यकता असते.आता सल्लागार म्हटलं कि जीवनात एखाद्या सल्लागार ठिक आहे. आवश्यक आहे पण कित्येक लोकांचे एकापेक्षा जास्त अनेक सल्लागार असतात आता आपण ज्यांना सल्लागार म्हणून विश्वासाने निवडले आहे. त्यांच्या ज्ञानावर ,विवेकावर,संयमावर , दुरदृष्टी वर आपलं यश अपयश ,मान सन्मान ,ताण तणाव, प्रगती, अधोगती, किर्ती, अपकिर्ती, ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात.तदनंतर आपला सल्लागार हा निस्वार्थी आहे कि मतलबी संधी साधु आहे प्रमाणिक आहे कि अ प्रमाणिक आहे हे खुप आणि अंत्यंत महत्वाचे आहे . सल्लागार हा आपल्याला जीवनाला शुन्यातून विश्वात घेऊन जाऊ शकतो तसेच विशवातुन शुन्यावर पण आणु शकतो . म्हणून सुयोग्य सल्लागार खुप महत्वपूर्ण आहे.
गणेश खाडे
संस्थापक वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य तथा वंजारी समाज ईतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर अध्यात्मिक मार्गदर्शक 9011634301