
दैनिक चालू वार्ता पुणे प्रतिनिधी- शाम पुणेकर.
पुणे : हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयात माजी नगरसेविका पूजा समीर कोद्रे यांच्या नावाचा फलक पालिका अधिकार्यांनी काढून टाकल्याच्या कारणावरून कोद्रे यांनी त्यांना दमबाजी करून कामात अडथळा निर्माण केला. या प्रकरणी अधिकारी व कर्मचारी यांनी संतप्त भावना व्यक्त करत काम बंद आंदोलन केले आहे.
हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयामधील माझ्या नावाचा बोर्ड का काढला ? याचा जाब विचारत पूजा कोद्रे यांनी गोंधळ घातला. बुधवारी मीटिंगसाठी हडपसर क्षेत्रीय कार्यालयामध्ये त्या आल्या होत्या. त्यांना प्रवेशद्वारावर त्यांचा असलेला नामफलक झाकून ठेवल्याचे दिसून आले, याचा राग त्यांना आला.
त्यामुळे त्या उपअधीक्षक प्रदीप भुजबळ यांच्या टेबलाकडे जात ‘माझ्या नावाचा बोर्ड का काढला’, अशी विचारणा करत गलिच्छ भाषेमध्ये शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी भुजबळ यांनी तात्काळ बोर्ड लावून त्यांना फोटो पाठवला, मात्र त्या ऐकण्यास तयार नव्हत्या. ‘उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सांगून तुझी नोकरी घालविते’ असा त्यांनी दम भरला.