
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- संभाजी गोसावी
कोरेगांव तालुक्यांतील करंजखोप गावचे कर्तव्यदक्ष जिल्हा पत्रकार यांचे पुतणे कु. संस्कार निवास पुरीगोसावी हा विद्यार्थी इयत्ता दहावी मध्ये 80 टक्क्यांनी चांगल्या गुणांनी विजयी झाला. संस्कार पुरीगोसावी यांनी आपले माध्यमिक शिक्षण हे श्रीपतराव कॉलेज करंजे पेठ सातारा या ठिकाणी पूर्ण केले. इयत्ता पहिलीपासून ते दहावीपर्यंत शाळेमध्ये वेळेत जाणे, वेळेत अभ्यांस करणे सर्व शिस्त पाळणे सर्व शाळेचे नियम तसेच दिवसभरांतील तासांचे वेळापत्रका प्रमाणे घरी आल्यानंतर ही तो अगदी तासांप्रमाणे अभ्यास करत असायचा. सौ. भाग्यश्री निवास पुरीगोसावी संस्कारच्या आई त्यासुद्धा आपल्या मुलांकडे अभ्यासा बाबतीत व इतर शिस्त पाळणे मुलांनी वेळेवर अभ्यास पूर्ण केला आहे का नाही? या बाबतीत त्या नेहमीच कर्तव्यदक्ष लक्ष असायचे. संस्कारांंच्या निकालाची व टक्केवारी चाहूल सकाळपासूनच मनात हुरहुर करीत होती. मात्र दुपारी ऑनलाईन निकाल पाहताच संस्कार पुरीगोसावी याने इयत्ता दहावी मध्ये 80 टक्के चांगल्या मार्कांनी गुण मिळवून बहुमतांने विजयी झाल्याबद्दल त्यांचे करंजखोप ग्रामस्थ मंडळी व कोरेगांव तालुक्यांसह सातारा जिल्ह्यांतून कौतुक व अभिनंदनचा वर्षाव झाला. काका संभाजी पुरीगोसावी यांची सध्या सातारा जिल्ह्यांतील विविध पोलिस स्टेशनला भेट देण्यासांठी धावपळ सुरु असतानाही आपल्या पुतण्यांची सातारा येथे सदिंच्छ भेट घेत संस्कार पुरीगोसावी यांचे कौतुक व अभिनंदन केले व पुढील पदवी शिक्षणासांठी शुभेच्छा दिल्या