
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- किशोर वाकोडे
तरोडा. (मोताळा):दि.१७/६/२०२२ ला सकाळी १०.३० वाजता सहस्रमुळी येथील बाळूमामाच्या मंदिराजवळ संजय शिंदे यांच्या शेताजवळ डांबर रोड च्या बाजूला गावठी पाच ते सहा कुत्र्यांनी मिळून रोह्याच्या पिल्लाला धरून शिकार करण्याचा प्रयत्न करीत होते.त्याचवेळेस सामाजिक कार्यकर्ते सतीश भाऊ गुरचवळे (रा.तरोडा)मोटर सायकलने मोताळा येथे जात असताना यांच्या ती बाब निदर्शनास येताच त्यांनी त्या कुत्र्यांना हाकलून लावले व त्या पिलाचा जीव वाचवला.नंतर सहस्रमुळी येथील संदेश सावळे हे पाठीमागे गाडी घेऊन आले त्यांनी सुद्धा त्या पिलाला वाचवण्यासाठी मदत करू लागले. त्यांना त्या रोह्याच्या पिला जवळ देखरेख करण्यासाठी ठेवले व लगेच सतीश गुरचवळे फॉरेस्ट ऑफिस मोताळा येथे जाऊन फॉरेस्ट ऑफिसला तशी माहिती दिली. लगेच तेथील दरोगा सानप साहेब यांनी त्यांच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटचे कर्मचारी जितेंद्र नारायण शेळके यांना व डॉक्टराना घटनास्थळी पाठवून त्या रोहिच्या पिलावर उपचार केला. जितेंद्र शेळके यांनी त्या पिलाला पाणी पाजून चारा खाऊ घातला. नंतर त्या रोह्याच्या पिल्लाला घनदाट जंगलामध्ये फॉरेस्ट च्या कर्मचाऱ्यांनी सुखरूप सोडून दिले. अशाप्रकारे जंगलातील त्या रोह्याच्या पिलाला जीवनदान देऊन सतीश गुरचवळे व त्यांचे सहकारी संदेश सावळे फॉरेस्ट डिपार्टमेंट चे कर्मचारी जितेंद्र शेळके यांनी त्यांच्या कार्यातून प्राणीमात्रावर दया करा. असा एक सामाजिक संदेश दिला.