
दैनिक चालु वार्ता विशेष प्रतिनिधी -पंकज रामटेके
वणी:-चंद्रपूर- नकोडा,वाया शिंदोला मुकुटबन बस सेवा पुर्वत सुरू करा अशी मागणी माथोली ( जु) येथील सरपंच व गावकऱ्यांनी माजी कॉबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार, चंद्रपूर आगार प्रमुख यांच्या कडे निवेदनातून केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, चंद्रपूर,नकोडा वाया शिंदोला, मुकुटबन ही बस सेवा वणी तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थ्यांना,आजारी नागरिकांना चंद्रपूर येथे उपचार घेण्याकरिता जाण्यासाठी अत्यंत सोईची बस सेवा होती.या बस मुळे माथोली,जुगाद, कैलासनगर,मुंगोली,साखरा,कोलगावशिवणी टाकळी,चिखली,येनक,येनाडी,शेवाळा शिंदोला,कुर्ली,वेळाबाई,मोहदा,कृष्णाणपूर,अडेगाव, खडकी गणेशपुर,नेरड,पुरड,मुकुटबन येथील सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी,व आजारी नागरिकांना ही बससेवा सुरू होती.अचानक कोरोना काळात ही बस सेवा बंद करण्यात आली.
त्यामुळे या परिसरातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी आर्थिक भार सहन करावा लागत आहे.या मार्गावरील बससेवा सुरू असल्याने वणी तालुक्यातील २५ गावातील नागरिकांना बस सेवा मिळाल्याने शैक्षणिक व आर्थिक विकास होण्यास मदत झाली.वणी तालुक्यातील शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना यांना फायदा झाला.
वणी तालुक्यातील नागरिकांना जिवनमान उंचावण्यासाठी आपल्या आगराच्या बससेवेची मदत झाली.करीता चंद्रपूर- नकोडा वाया शिंदोला मुकुटबन बस सेवा सुरु करुन सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा.असे लेखी निवेदनात लिहिले आहे.या निवेदनावर चंद्रपूर आगार प्रमुख काय कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.