दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर- संतोष मंनधरणे
देगलुर (प्रतिनिधी):- दिनांक १९ जुन २०२२ रोज रविवारी ११.०० वाजता विश्रांती गृह देगलुर येथे राष्ट्रिय समाज पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला राष्ट्रिय समाज पक्षाचे राष्ट्रीय संघटक या गोविंदराम शूरनर, रासपाचे जिल्हाध्यक्ष प्रा शिवाजीराव इंदूरे ,महिलाध्यक्षा अॅड चंद्रभागताई बंदखडके,युवाध्यक्ष नितीन सापनर यांची उपस्थिती लाभणार आहे. या आढावा बैठकिला येवू घातलेल्या नगरपालिका, व जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणूकाच्या संदर्भाने राष्ट्रिय संघटक गोविंदराव शूरनर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच या आढावा बैठकित पक्षाच्या सर्व आघाड्यांवर नविन नियुक्ती झालेल्या पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देण्यात येणार आहे.
तरी सर्व कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन तालुकाध्यक्ष अॅड योग्यश मंत्री (मो.8087512713 ), अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष अहमद मनेर (मो.9028312077), देगलूर शहराध्यक्ष मलिकार्जुन कडलवार (8956003752) यांनी केले.
