
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी- शाम पुणेकर.
पुणे : खालील कोणत्याही एका पद्धतीने आपल्याला आवडणारा, सोपा मार्ग निवडा. आणि एक जागरूक नागरिक व्हा !
टोल फ्री क्रमांक : १८००१०३०२२२
website: http://complaint.punecorporation.org
व्हाटसअँप क्रमांक :- ९६८९९००००२
तक्रार दिल्यावर आपल्याला एक टोकन नंबर दिला जातो. तक्रारीचे निवारण किती दिवसात केले जाईल ह्याची हि माहिती आपण घेऊ शकतो.
आपण पुणे म.न.पा. ला देऊ विविध तक्रारी करू शकता.
१) महानगरपालिकेच्या अखत्यारीतील शाळांबद्दल उदा. पिण्याचे पाणी उपलब्ध नाही, संडास साफ नाही ई.
२) जन्म मृत्यू दाखल्यासंबधी
३) इमारत परवानगी विषयी
४) विकास आराखड्याविषयी
५) ड्रेनेज विषयी उदा. गटार तुंबणे, चेंबर भरून वहाने ई.
६) विजेचे खांब या विषयी
७) अतिक्रमणाविषयी
८) पार्किंग विषयी, स्विमिंग पूल विषयी
९) कचरा विषयी
१०) बागेविषयी
११) प्रदूषण विषयी, भटक्या कुत्र्याविषयी
१२) डेंगू विषयी, डासांविषयी
१३) मनपाची वेबसाईट विषयी
१४) अनधिकृत फ्लेक्स, होर्डिंग विषयी
१५) प्रधानमंत्री आवास योजना विषयी
१६) मिळकत कराविषयी Property Tax
१७) पुणे स्मार्ट सिटी विषयी
१८) रस्ता, झेब्रा क्रॉसिंग विषयी
१९) झोपडपट्टी विषयी
२०) TDR विषयी
२१) P1, P2 पार्किंग विषयी
२२) झाडांविषयी, धोकादायक फांद्या तोडण्याविषयी
२३) पिण्याच्या पाण्याविषयी – पाण्याची वेळ बदलणे, प्रेशर वाढविणे ई.
दर महिन्याला प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात मोहल्ला समितीची मिटिंग असते. ह्या मिटींगला सहाय्यक आयुक्त उपस्थित असतात. जागरूक नागरिकांनी, समाजासाठी ज्यांना योगदान द्यायची इच्छा आहे ते जरूर हजर राहू शकता असे प्रशासनाने कळविले आहे.