
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
मार्च 2022 मध्ये घेण्यात आलेल्या एस.एस.सी. परीक्षेचा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला. या परीक्षेत जिजामाता कन्या प्रशाला अकलूज प्रशालेने उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. यावर्षी प्रशालेचा निकाल 100% टक्के लागला असून, 18 विद्यार्थ्यांनी 90 % टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून सुयश प्राप्त केले.दिक्षा ज्ञानेश्वर निंबाळकर या विद्यार्थिनीने 96.80 टक्के गुण मिळवत तालुक्यात. मुलींमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
तसेच प्रशालेमध्ये दिक्षा ज्ञानेश्वर निंबाळकर 96.80 टक्के प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, नेहा नितीन बनकर 95.00 टक्के, तृतीय क्रमांक, महाडिक सृष्टी किशोर 94.80 टक्के मिळवून सुयश प्राप्त केले आहे.
गुणवंत विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे जिजामाता कन्या प्रशाला अकलूज संस्थेच्या सचिव सौ.शितलदेवी धैर्यशील मोहीते पाटील यांनी अभिनंदन केले.
कु.दिक्षा निंबाळकर हि इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व शेटफळ हवेली ग्रामपंचायत चे विद्यमान सदस्य मा.श्री.ज्ञानेश्वर निंबाळकर यांची कन्या आहे.