दैनिक चालु वार्ता लोहा प्रतिनिधी- गोविंद पवार
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च- एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या एसएससी बोर्ड परिक्षेचा निकाल दि. १८जून २०२२ रोजी जाहिर झाला असुन यात लोहा तालुक्यातील मौजे शेवडी (बा.) येथील कै. बाबारावजी धोंडे अनु जाती निवासी माध्यमिक शाळेने घवघवीत यश संपादन केले असून शाळेचा निकाल ९८ टक्के लागला आहे.
यात शाळेतून ९० टक्के गुण घेऊन कु. शेख शारमिन रऊफ या विद्यार्थ्यांनीने प्रथम क्रमांक पटकावला तर कु. तेजबंद शिवदिक्षा वैजेनाथ या विद्यार्थ्यांनीने ८८ टक्के गुण घेऊन दित्तीय व एडके तेजेश्विनी किशन या विद्यार्थ्यांनीने तिसरा क्रमांक पटकावला आहे.
तसेच यासह उत्तीर्ण विद्यार्थ्यां पैकी१६ विद्यार्थी हे विशेष प्राविण्य सह उत्तीर्ण झाले तर १४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.शाळेतील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक,व शिक्षकांनी अभिनंदन केले तसेच संस्थेचे सचिव प्रा. मनोहर धोंडे सरांनी भ्रमणध्वनी वरुन सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे कौतुक व अभिनंदन केले.
