
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी -गोविंद पवार
लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे भावी सभापती म्हणून ओळखले जाणारे माणिकराव मुकादम (चव्हाण) यांचा कारेगाव सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत दणदणीत विजय झाला आहे.
कंधार व लोहा पंचायत समितीचे व लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिवंगत व्यंकटराव मुकादम यांचे थोरले सुपुत्र माणिकराव मुकादम चव्हाण हे माजी कूषी अधिकारी असुन त्यांनी सेवा निवृत्ती नंतर त्यांनी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली सक्रिय राजकारणात सहभाग घेऊन ते भाजपा पक्षात कार्यरत आहेत. ते भाजपाचे राज्य कार्यकारिणी सदस्य आहेत.
ते खा.चिखलीकरांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. त्यांचे वडील दिवंगत व्यंकटराव मुकादम ( चव्हाण) लोहा – कंधार तालुक्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा कंधार व लोहा पंचायत समितीचे व लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती होते.
त्यांनी त्यांच्या सभापती पदाच्या कार्यकाळात कंधार व लोहा तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकास कामे केली तसेच लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून ही उत्कृष्ट काम करून लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात केली.
त्यांचा वारसा जोपासत लोहयात मुकदम कुटुंबीय सक्रिय राजकारणात असुन जनतेची सेवा करतात माणिकराव मुकादम यांच्या मातोश्री जिजाबाई मुकादम या लोहा न.पा. च्या माजी नगराध्यक्षा आहेत तर बंधु केशवराव मुकदम हे विद्यमान नगरसेवक आहेत .
लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ संपून अनेक दिवस झाले आहेत कोरोना काळात शासनाने त्यांना काही दिवस मुदत वाढ दिली आता लवकरच लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीची सार्वत्रिक निवडणूक होण्याची शक्यता आहे.
लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक होण्यासाठी व निवडणूक लढविण्यासाठी ग्रामीण भागातून सेवा सहकारी सोसायटीतून निवडून येणे अनिवार्य होते.
आता कारेगाव येथील मतदारांनी दि. १७ जून रोजी झालेल्या सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत माणिकराव मुकादम (चव्हाण) यांना भरघोस मतांनी विजयी केले. त्यामुळे आता आगामी लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लढविण्याची माणिकराव मुकादम हे पात्र झाले असून आपल्या वडीलांचा वारस जोपासत शेतकरी शेतमजूर व्यापारी हमाल माथाडी आदी ची सेवा
करण्यासाठी ते लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक खा. चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली लढवून ते लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती होतील व त्यांना भावी सभापती म्हणून जनतेतून ओळखले जात आहे.