
दैनिक चालू वार्ता गंगापूर प्रतिनिधी-सुनिल झिंजूर्डे पाटिल
चक्क हात लागेल आशा अंतरावर आल्या विद्युत तारा
गावातील घटना डोळ्यासमोर असतानाही अधिकारी कर्मचाऱ्यांचा कानाडोळा.
भिवधानोरा (ता गंगापूर) येथे चक्क गावा अंतर्गत असलेल्या विद्युत तारा आसमान सोडून जमिनीवर आवतरण्याच्या मार्गावर असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.अगदी थोड्या उंचवट्यावर आले असता व सहज हात वरकेल्यास हाताला स्पर्श होईल अशा अंतरावर विजेच्या चालू प्रवाहाच्या तारा खाली आल्या आहे. कर्मचाऱ्यांकडून खाली आलेल्या तारा अनेक वेळा लाकुड व बांबूच्या सहाय्याने वरती बांधण्यात आल्या असून अधिकारी व कर्मचाऱ्यांनचा वेळकाढूपणा पुन्हा एकदा ग्रामस्थांच्या समोर आला आहे.वारे सुटल्यावर सांयकाळच्या वेळेस दोन तारांमध्ये घर्षण होऊन अनेक वेळा आगीचे गोळे हे खाली पडत असल्याचे आढळून आले आहे.खाली पडणाऱ्या आगीच्या गोळ्यांमुळे नकळत पने तारांखाली खेळत असलेल्या लहान मुलांच्या ही जिवीतचा प्रश्न आता पालकांना सतावत आहे.
महावितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे काही वर्षांपूर्वी भिवधानोरा येथील वत्सलाबाई शिंदे या वृद्ध महिलेचा अंगावर विजेची तार पडून मृत्यू झाला आहे.आता निद्रा अवस्थेत असलेले अधिकारी व कर्मचारी आणखी किती बळी घेणार असा प्रश्न आता ग्रामस्थांकडून उपस्थित होत आहे.
मी आमच्या अधिकाऱ्यांशी बोलून संबंधित विधुत तारांविषयी एक एजन्सी लावतो तसेच कामनविषयी व काही मेंटेनन्स विषयी अधिकाऱ्यांना कळवतो ते 1 ते 2 दिवसात काम पूर्ण करतील त्याच बरोबर आणखी काही प्रॉब्लेम्स असेल तर अधिकाऱ्यांना कळवतो तारा खाली आल्या असतील
व जे काही खराब पोल असेल ते लगेच दूर करण्यास सांगतो
राजकिशोर जैयस्वाल
(कार्यकारी अभियंता)
महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे संबंधित कार्यालयात ग्रामपंचायतने वेळोवेळी पाठपुरावा केला आहे.आता काम मंजूर झाले असून एजन्सी नेमणूक करण्यासाठी महावितरण कंपनी वेळकाढूपणा करत आहे.त्यात पाऊस झाला म्हणजे हे काम होणे शक्य नाही त्याच्यासाठी आम्ही पाठपुरावा करत आहे परंतु अधिकारी त्याला प्रतिसाद देत नाही.
बाबासाहेब चव्हाण
उपसरपंच भिवधानोरा