
दैनिक चालू वार्ता नांदेड उत्तर जिल्हा प्रतिनिधी- समर्थ दादाराव लोखंडे
*******************************
नांदेड– दिपक नगर, तरोडा (बु), नांदेड येथील श्री निकेतन हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी लातुर बोर्डाने आयोजित केलेल्या एस. एस. सी. परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले असून शालेचा निकाल 98 टक्के लागला आहे. या निमित्य संस्थेच्या अध्यक्षा सौ ए जी नरवाडे मॅडम, सचिव श्री कपिल नरवाडे सर, शाळेचे मुख्याध्यापक श्री यशवंत थोरात सर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
शाळेतील तब्बल 12 विद्यार्थ्यी डिस्टिंक्शन मध्ये उत्तीर्ण झाले आहेत, 18 विद्यार्थ्यी ग्रेट फर्स्ट मध्ये तर, 12 विद्यार्थ्यी ग्रेट सेकंड मध्ये उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत असून, संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुणा नरवाडे मॅडम यांनी शिक्षकांचे परिश्रम विद्यार्थ्यांची मेहनत याचे फलित म्हणजे शाळेचा लागलेला 98 टक्के निकाल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. संस्थेचे सचिव श्री कपिल नरवाडे सर, शाळेचे मुख्याध्यापक श्री यशवंत थोरात सर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. तसेच 10 वीच्या सर्व विषय शिक्षकांचे अभिनंदन केले.