
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
लोहा तालुक्यांत भाजपाला पडले मोठे खिंडार
भाजपाचे खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांची लोहा तालुक्यातील हिटलरशाही मोडीत काढण्यासाठी भाजपाचे लोहा तालुकाध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष विद्यमान नगरसेवक शरद पाटील पवार यांनी नगरसेवक बालाजी शेळके यांना सोबत घेऊन भाजपाला रामराम ठोकून जय हो चा नारा देत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अशोकराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे जाहीर प्रवेश केला असल्यामुळे लोहा शहर व तालुक्यात भाजपाला मोठे खिंडार पडले आहे.
लोहा न.पा. चे माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक शरद पाटील पवार यांनी गेली अनेक वर्षे खा. चिखलीकरांना साथ दिली शरद पाटील पवार हे लोहा शहर व तालुक्यातील एक तरुण तडफदार डॅशिंग कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात त्यांच्या मागे तरुणांची मोठी फळी आहे तसेच त्यांना मानणारा लोहा तालुक्यात ग्रामीण भागात सर्व जाती धर्मातील नागरिक, कार्यकर्ते आहेत.
शरद पाटील पवार हे भाजपचे तालुकाध्यक्ष असताना पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेत होते . लोहा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यासाठी त्यांनी जिवाचे रान केले लोह न.पा. च्या वतीने लोहा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे काम सुरू केले आहे. आता चबुतऱ्या पर्यंत काम झाले आहे . छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे काम त्यांच्या उपनगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात पुर्ण व्हावे यासाठी त्यांनी खा. चिखलीकर यांच्या कडे मागणी केल्याचे लोहा येथील पत्रकार परिषदेत सांगितले होते पण वाढती लोकप्रियता पाहून खा. चिखलीकरांनी नांदेड जिल्ह्यात व लोहा तालुक्यांत भाजपा मध्ये आपली एकाधिकारशाही व घराणेशाही चालवली. खा प्रतापराव पाटील चिखलीकर, त्यांचे पुत्र प्रविण पाटील चिखलीकर व मुलगी यांच्या पुरतात पक्ष लिमिटेड ठेवून पक्षात घराणेशाही चालवली शरद पाटील पवार यांना अनेक कार्यक्रमांत डावळले जात होते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या कामा जवळ जाण्यास मज्जाव केला जात होता एवढेच नाही तर खा. चिखलीकरांनी शरद पाटील पवार हे लोहा न.पा.चे उपनगराध्यक्ष म्हणून धडाकेबाज कामगिरी करीत असताना सुद्धा शरद पाटील पवार यांच्या वर भाजपाच्या नगरसेवकांना आदेशित करून तात्कालीन उपनगराध्यक्ष शरद पाटील पवार यांच्या वर अविश्वास ठराव पारित करावा लावला.
खा.चिखलीकर यांना लोहा शहरात मोलाची साथ दिली वेळप्रसंगी अनेक भांडण तंटे अंगावर घेतले त्यांना जुन्या लोहयातून काही कार्यकर्ते येण्यास मज्जाव करीत असताना शरद पाटील पवार यांनी पुढाकार घेऊन विरोधकांना गप्प बसविले .
प्रत्येक निवडणुकीत साथ दिली .
माळेगाव यात्रेत आ. शामसुंदर शिंदे यांचे भांडण अंगावर घेतले .
असे अनेक प्रसंग अंगावर घेऊन लोहा शहर तालुक्यात काम करीत असताना सुद्धा ” खऱ्या ची , वनवासा म्हटलंय प्रमाणे शरद पाटील पवार यांच्या वर अन्याय झाला.
स्वाभिमानी बाणा असलेले शरद पाटील पवार हे खा. चिखलीकरापुढे झुकले नाहीत इतरांसारखा गोंडा त्यांच्या समोर न हालविता त्यांनी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेत घेऊन खा. चिखलीकर यांच्या तक्रारीचा पाढा वाचला त्यानंतर त्यांच्या पासून अंतर दूर ठेऊ त्यांच्या बॅनर पोस्टरवरुन त्यांना हटविले .
तर आज थेट त्यांनी खा. चिखलीकर यांच्या हिटरशाही विरोधात दंड थोपटून त्यांनी मुंबई येथील मेघदूत बंगल्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अशोकराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस मध्ये आपले साथीदार नगरसेवक बालाजी शेळके यांना सोबत घेऊन जाहिर प्रवेश केला. यावेळी आ. अमरनाथ राजूरकर, काँग्रेसचे लोहा शहराध्यक्ष वसंत पवार, नगरसेवक संभाजी पाटील चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष सोनू संगेवार, नगरसेवक जीवन पाटील चव्हाण, माजी नगरसेवक पंकज परिहार, अनिल दाढेल, शरफौदीन शेख, माजी सैनिक व्यंकटराव घोडके आदी उपस्थित होते.
शरद पाटील पवार यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे लोहा शहर व तालुक्यात भाजपाला मोठे खिंडार पडले असुन काँग्रेस पक्षाची ताकद वाढली आहे.
येणाऱ्या निवडणुका लोहा तालुक्यात भाजपाला जड जातील तर काँग्रेसला सोप्या जातील तसेच अनेक भाजपाचे नगरसेवक व पदाधिकारी काँग्रेस मध्ये प्रवेश करतील अशी माहिती नगरसेवक शरद पाटील पवार यांनी दिली.