दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- संभाजी गोसावी .
पुणे जिल्ह्यांचे तत्कालीन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी ऐन कोरोनांच्या काळात पुणे जिल्ह्यांचा जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला होता. गेल्या दोन वर्षापासून कोरोनांचा मुकाबला करण्यासाठी एकही दिवस सुट्टी न घेता पुणेकरांच्या सेवेत असणाऱ्या जिल्हाधिकारी देशमुख यांना अखेर कोरोनांने गाठले. कोरोनांच्या पहिल्या लाटेपासून डॉ. राजेश देशमुख स्वता रस्त्यावर उतरुन कोरोना रुग्णांसाठी अविरत झटत होते. कोरोना आटोक्यांत आणण्यासांठी त्यांनी प्रशासकीय पातळीवर उत्तम नियोजन केले होते मागील दिवसापासून सातत्यांने कोरोनांच्या रुग्ण संख्येत वाढ होत आहे. राज्यांचे माजी उपमुख्यमंत्री मा. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली अनेक वेळा बैठका या सुरु होत्या पवार यांना देखील कोरोना झाला होता. त्यांच्या पाठोपाठ कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय पुणेकरांच्या सेवेत असणारे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना सुद्धा अखेर कोरोनांने गाठले. डॉक्टरांच्या निगराणीखाली जिल्हाधिकारी देशमुख हे आपल्या शासकीय निवास ठिकाणीच उपचार घेत आहेत.
