
दैनिक चालु वार्ता अक्कलकुवा प्रतिनिधी -आपसिंग पाडवी
दरवर्षाप्रमाणे ९ आॅगस्ट विश्व आदिवासी गौरव दिवस अक्कलकुवा येथे साजरा करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने गौरव दिवस महोत्सवाच्या नियोजनासाठी पंचायत समितीच्या दिगंबर राव पाडवी सभागृहात बैठक संपन्न झाली.
बैठकीला आ.आमश्या पाडवी,आदिवासी महा संघाचे अध्यक्ष डॉ भरत पाडवी,नागेश पाडवी,सचिव हिरामण पाडवी, किसन महाराज, शिवसेनेचे तालुका प्रमुख मगन वसावे,जि.प.सदस्य शंकर पाडवी, पंचायत समिती सदस्य जेका वसावे, ऍड.सुधीर पाडवी,पृथ्वीसिंह पाडवी,लोकसंघर्ष मोर्चाचे रमेश नाईक, ऍड.रुपसिंग वसावे, याहामोगी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष विनोद वळवी,टेडग्या वसावे,तुकाराम वळवी,निलेश पाडवी, आदी उपस्थित होते.बैठकीच्या प्रारंभी याहामोगी मातेच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.बैठकीत 9 ऑगस्ट रोजीच्या कार्यक्रमा विषयी चर्चा करण्यात आली.बैठकीला विविध गावांचे पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच, गाव पुजारा, विविध संघटनेचे पदाधिकारी, विविध पक्षाचे राजकीय प्रतिनिधी गाव कारभारी, विद्यार्थी, युवा वर्ग, नोकरवर्ग, आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.बैठकीचे सूत्रसंचालन आदिवासी महासंघाचे सचिव जी.डी.पाडवी यांनी तर उपस्थितांचे आभार कान्हा नाईक यांनी मानले.