दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भुम:- तालुक्यातील पथारुड येथे आपुलकी वसतिगृहचा पाचवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी आपुलकी परिवारात दीप प्रज्वलन करून श्री छत्रपती शिवाजी महाराज व गाडगे महाराजांच्या प्रतिमेचे पूजन पोलीस निरीक्षक दत्तात्रेय सुरवसे, पोलीस कॉन्स्टेबल गोलेकर ,तानाजी बोराडे सर, सरपंच शिवाजी फाळके ,संजय काका बोराडे ,अभिजीत पाटील, दत्तात्रय डोके, भरत पाटील बोराडे यांनी केले. गरीब गरजू विद्यार्थ्यांना मोफत निवासी राहण्याची शिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे. असे महादेव वडेकरांनी सूत्रसंचालन केले त्याप्रसंगी भाऊसाहेब बोराडे, दत्तात्रेय बोराडे सर,अशोक माने मयूर पवार ,फौजी रणधीर भोगल, दत्तात्रय सोनार ,मुख्याध्यापक गायकवाड सर ,जनार्धन काटे ,अर्जुन रांजवण विद्यार्थी वर्ग ग्रामस्थ उपस्थित होते या सर्वांचे आभार सविता दरंदले, राजेंद्र दरंदले यांनी व्यक्त केले.
