
दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
=====================
अहमदपूर (प्रतिनिधी)
इंग्लिश टिचर फोरम च्या वतीने काल शासकीय विश्रामगृह अहमदपूर येथे तालुक्यातील इंग्रजी विषयाच्या नवनियुक्त मुख्याध्यापकांचा गौरव करण्यात आला. सत्काराने सन्मानित करण्यात आलेल्या मुख्याध्यापकां मध्ये श्री संत सदगुरू विद्यालय उजना येथील चंद्रकांत मोरे सर,साने गुरुजी विद्यालय येस्तार चे सुनिल जाधव सर,संत जनाबाई माध्यमिक विद्यालय चिखली चे राजेंद्र बामणे सर, कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालय मांडणी चे मोहन आढाव सर, नेताजी सुभाषचंद्र बोस माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय किनगाव चे प्रकाश कळसाईतकर सर, दत्तात्रय विद्यालय डोंगरगाव चे अशोक कदम सर यांचा समावेश होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंग्रजी विषयाचे तज्ञ साधन व्यक्ती व इंग्लिश टिचर फोरम अहमदपूर चे तालुका प्रमुख भिमराव कदम हे होते. यावेळी सत्कारमुर्ती मुख्याध्यापकांना शुभेच्छा देताना भिमराव कदम यांनी तालुक्यातील इंग्रजी विषयाच्या शिक्षकांना मोठ्या प्रमाणात मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती मिळणे हे गौरवास्पद असुन “इंग्रजी पाऊल पडते पुढे” अशी भावना व्यक्त केली.
या कार्यक्रमासाठी इंग्लिश टिचर फोरम चे तालुक्यातील इंग्रजी विषयाचे शिक्षक सुदर्शन तांदळे, माधव गोरे, राजकुमार बुरले, शशिकांत भरडे, दशरथ जाधव, संतोष गिरी, गोविंद बळवंते, नरसिंग इजारे , आवाज बहुजनांचा न्युज लाइव्ह चे संपादक शिवाजीराव गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन उमाकांत पाचंगे यांनी तर आभार अभयसिंह कच्छवे यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या आयोजन व यशस्वीतेसाठी इंग्लिश टिचर फोरम चे सदस्य बाबासाहेब वाघमारे, गौतम कांबळे यांनी परिश्रम घेतले.