
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
उदगीर—
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत २०२२मध्ये चालू असलेल्या सर्व शिक्षणक्रमाच्या परीक्षा २४जून पासून येथील शिवाजी महाविद्यालयात उदगीर येथे सुरळीत सुरू झाल्या आहेत. या परीक्षा सुरुळीत व व्यवस्थित रित्या पार पडत आहेत यासाठी बहिस्थ पर्यवेक्षक म्हणून डॉ.ओम पाटील विवेक वर्धिनी महाविद्यालय देवणी व प्राचार्य डॉ. विनायक जाधव, केंद्र संयोजक डॉ. आर एम मांजरे ,केंद्र सहाय्यक प्रा. आनंत पाटील व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत.