
दैनिक चालू वार्ता परभणी प्रतिनिधी-दत्तात्रय वा.कराळे
परभणी शहर व लगतच्या परिसरात मागील कित्येक कालावधीपासून क्राईम रेषो कमालीचा वाढीस लागला आहे. एकापाठोपाठ एक असे खूनाचे सत्र सुरुच आहे. कधी धारदार शस्त्रांचे जीवघेणे हल्ले, तर कधी भयानक मारामा-या तर शहराच्या अनेक भागात नियमित होणा-या जबरी घरफोड्या व चो-या. शहराच्या काही भागात सातत्याने आढळून येणारे अंमली पदार्थांचे मोठमोठे साठे तर काही ठिकाणी धारदार शस्त्र व तलवारींसारख्या जीवघेणे हत्याराने कोठे ब-याच ठिकाणी आढळून येतात. ब-याच ठिकाणी इंग्लिशचे अवैध साठे व गावठी दारुचे गुत्ते तर कित्येक परिसरात गर्दुल्यांचे अड्डे आढळून येतात. या आणि अशा अनेक कारणांमुळे परभणी शहर व लगतच्या कित्येक परिसरात दिवसेंदिवस क्राईम रेषो अधिकच वाढत चालला आहे. परिणामी कायदा व सुव्यवस्था पूरती कोलमडली जावून अनेकांना भयभीत अवस्थेत जीवन जगताना आपले कधी काय होईल याची शाश्वती सुध्दा देणे कठीण होऊन बसले आहे, अशी भयानक चर्चा मोठ्या प्रमाणात परंतु भीतीपोटी दबक्या आवाजात ऐकावयास मिळते.
दरम्यान या व अशी नानाविध प्रकरणे व घात़क घटनांची नोंद ध्यानी घेऊन परभणी पोलिसांची प्रतिष्ठा पणाला लागली जाणे स्वाभाविक आहे. वरिष्ठांच्या धसकीने कमालीची कसोटी लागल्याचे बोलले जात आहे.
दिवसेंदिवस वाढणा-या नागरीकरणात गुन्हेगारी प्रवृत्तीही ब-यापैकी बोकाळल्याचे वाढत्या गंभीर घटनांवरु स्पष्ट होत आहे. पोलीस ठाण्यांबरोबरच अधिकारी व कर्मचा-यांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ होणे अत्यंत आवश्यक आहे. दिवसा आणि विशेषतः रात्रीची गस्तही मोठ्या प्रमाणात वाढवून सराईत व संशयीत आरोपींच्या मुसक्या शिताफीने तात्काळ आवळणे अधिक गरजेचे आहे. खतरनाक आरोपींना मोक्का लावून जेलमध्ये सोडवले तर आणि तरच वाढती गुन्हेगारी नियंत्रणात आणणे शक्य होईल अन्यथा म्हातारी मेल्याचे दु:खापेक्षा काळ सोकावता कामा नये हे सुत्र जर अंमलात आणले गेले तरच पोलीस यंत्रणेवरचा त्राण कमी होऊ शकेल सोबतच कायदा व सुव्यवस्था सुध्दा सोयीची राखण्यात मदत होईल अन्यथा खाकीचा वचक संपुष्टात येतोय की काय अशी शंकाही वाढीस लागल्याचे दिसून येईल एवढे मात्र खरे !