
दैनिक चालु वार्ता चाकुर प्रतिनिधी -नवनाथ डिगोळे
अजनसोडा बु येथील शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या सत्यवान तुळशीदास माने याने, चापोली येथील, स्वामी विवेकानंद विद्यालयात इयत्ता 10 मध्ये, 94 % घेऊन, मुलात प्रथम तर सर्वात तृतीय येऊन बहूमान मिळवला. तसेच युवा स्पंदन संस्था पुणे, मार्फत घेण्यात आलेल्या दत्तक योजना काॅलर्शिप परीक्षेत 30 मुलामध्ये 100/100 गुन घेऊन उत्तीर्ण होऊन, सुभाष चंद्र बोस सैनिकी शाळा फुलगाव. ता हवेली येथे पुढील शिक्षणासाठी काॅलर्शिप पाञ झाला असल्या मुळे, अजनसोडा बु व तालुक्यात सर्वञ त्यांचे कौतुक होत आहे. व सर्व क्षेञातुन पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.
….सर्वांचे वडीलांनी अभार व्यक्त केले.