
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- राज्य शासन सेवेत नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महिला व बाल विकास विभागाचा महत्वपुर्ण शासन निर्णय दि.०७ जुलै रोजी निर्गमित झालेला आहे.सदर शासन निर्णयानुसार राज्य कर्मचाऱ्यांना दोन संधी व दोन वर्ष इतकी मुदतवाढ देण्यात आली आहे.याबाबतचा दि.०७ जुलै २०२२ रोजीचा सविस्तर शासन निर्णयामध्ये देण्यात आले आहे.
महीला व बाल विकास विभागाकडुन अनाथंसाठीचे धोरण सुधारीत करण्यात आलेले आहेत.यानुसार अनाथांना शिक्षण व नोकरी यामध्ये एकुण पदांच्या एक टक्के आरक्षण देण्यात आले आहेत.यानुसार शासन सेवेतील ज्या पदाच्या सेवा प्रवेश नियमांमध्ये टंकटेखनाची परीक्षा उत्तीर्ण होण्याची अट असेल अशा पदांवर अनाथ उमेदवारांना जर नियुक्ती मिळाली असल्यास अशा कर्मचाऱ्यांस टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी नियुक्तीच्या दिनांकापासून २ वर्षे कालावधी व २ संधीत परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी शासनाकडुन मान्यता देण्यात आली आहे .
यामुळे अनाथ प्रवर्गातील उमेदवारास दोन वर्षे व दोन संधी देण्यात आल्याने सदर कर्मचाऱ्यांस या निर्णयाचा फायदा होणार आहे