
दैनिक चालु वार्ता म्हसळा प्रतिनिधी – अंगद कांबळे
म्हसळा –
श्री.गजानन मित्र मंडळ,देवघर कोंड (रजि.) या नोंदणीकृत मंडळाच्या वतीने रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवघर कोंड या शाळेतील विद्यार्थ्यांना , अंगणवाडीतील बालकांना शैक्षणिक साहित्य वह्या, पेण, पेन्सिल व शालेय उपयोगी साहित्य गरजू ६० विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.
यावेळी या कार्यक्रमाला उपस्थित. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मनोज गिजे , उपाध्यक्षा वेदिका पोटले, मंडळाचे अध्यक्ष शिवराम बांद्रे , उपाध्यक्ष गितेश गिजे सेक्रेटरी संतोष पाखड, खजिनदार सुजित पोटले,मंडळाचे सदस्य गजानन जोशी,गणपत मुंडे , द्रौपदी शिर्के, सुभाष गिजे, दर्शना शिर्के, मनोहर चौकेकर, मुंबई मंडळाचे ग्रामस्थ संजय बांद्रे , दिनेश बांद्रे , योगेश भुवड, धीरज गिजे, रंजीत पाखड, शिरीष शिर्के, आदी मान्यवर उपस्थित होते. राजिप शाळा-देवघर कोंड शाळेचे मुख्याध्यापक चव्हाण सर, प्राथमिक शिक्षक करवते सर, सय्यद सर , ठाकरे सर शिक्षक वृंद उपस्थित होते.
श्री . गजानन मित्र मंडळ देवघर कोंड या मंडळाचे उद्दिष्टे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रिडा डोळ्यासमोर ठेवून देवघर कोंड बरोबर परिसरातील गायरोणे, देवघर,ढोरजे, कुडतुडी गौळवाडी, कुडतुडी आदीवासी वाडी, या पंचक्रोशीत शैक्षणिक साहित्य स्व.गजानन गिजे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त वाटप करण्यात आले. यावेळी प्राथमिक शाळा देवघर कोंड या शाळेला गिजे परिवारातर्फे जीवनावश्यक वस्तू भेट देण्यात आल्या. यावेळी वृक्षरोपन करण्यात आले. विविध औषधी वनस्पती, फळझाडे,फुलझाडे लावण्यात आली व वाटप करण्यात आली.
यावेळी ग्रामस्थ व महिला आवर्जून उपस्थित होते. शाळेचे विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांनी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे सेक्रेटरी श्री. संतोष पाखड यांनी केले व आभार प्रदर्शन प्राथमिक शिक्षक करवते सर यांनी केले.
स्वर्गिय गजानन भिकु गिजे यांची सामाजिक कार्याची सुरुवात हि गाव स्तरावरून केली होती. गेली अनेक वर्षे ग्रामस्थ मंडळ देवघर कोंड ग्रामिण पातळीवर अध्यक्ष पद भूषविले होते.यावेळी गावच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी गावातील लहान थोरांना सोबत घेऊन प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील असतं. तसेच ग्रामपंचायत देवघर मध्ये ग्रा.पं. सदस्य, उपसरपंच पद सांभाळलेले होते. नवरात्र उत्सव मध्ये विविध सांस्कृतिक व जनजागृती चे कार्यक्रम हाती घेऊन यशस्वीपणे पुढे नेण्यासाठी सिंहाचा वाटा असे. म्हसळा तालुका कुणबी समाज उत्तर – मध्य विभागाचे अध्यक्ष पदावर कार्यरत होते, कुणबी समाज तालुका कमेटीवर उपाध्यक्ष अशा विविध सामाजिक, शैक्षणिक , सांस्कृतिक क्षेत्रात अतिशय उल्लेखनीय कार्य करत होते. म्हणून त्यांच्या कार्याची महती पाहता श्री. गजानन मित्र मंडळ स्थापन करून भविष्यात नक्कीच सर्व सदस्य व कार्यकर्ते, ग्रामस्थ यांना सोबत घेऊन त्यांच्या कार्याची वाटचाल सुरू ठेऊ हिच विचारधारा या प्रथम स्मृतिदिनानिमित्त विचार व्यक्त करत आहे.
– श्री. शिवराम बांद्रे . अध्यक्ष
(गजानन मित्र मंडळ देवघर कोंड)
मरावे परी किर्ती रूपे उरावे या प्रमाणे शैक्षणिक क्षेत्रात ज्यांचा हातखंडा होता ते देवघर कोंड गावचे नेहमी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रेरणा देणारे स्वर्गीय गजानन भाऊ गिजे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आज शाळेत व पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना वह्या, शैक्षणिक साहित्य वाटप करून आज समाजसेवक यांच्या कार्याबद्दल एक आठवण म्हणून मंडळाने शैक्षणिक उपक्रम हाती घेतल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक यांनी श्री गजानन मित्र मंडळ देवघर कोंड यांचे आभार मानले. व पुढील त्यांच्या मंडळाचे उत्तोराउत्तर कार्य वटवृक्षा प्रमाणे चालत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना केली.
– मुख्याध्यापक श्री. परशूराम चव्हाण सर
रा जि प शाळा देवघर कोंड.