
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
लोहा-कंधार मतदार संघात सलग दोन ते तीन दिवसापासून मुसळधार पाऊस पडत असल्याने लोहा तालुक्यातील उमरा सर्कलमधील मध्ये अतिवृष्टीच्या पावसामुळे खृरिप पिकांचे अतोनात नुकसान झाले होते तालुक्यातील भूकमारीला जाणारा मुख्य रस्त्यावर पाणीच पाणी होऊन हा रस्ता बंद झाला होता या होता लोहा कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी या भागातील पूर परिस्थिती प्रत्यक्ष शेतीच्या बांधावर जाऊन पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धिर दिला व या भागातील अतिवृष्टीने बाधित शेतीमध्ये प्रत्यक्ष जाऊन आमदार शामसुंदर शिंदे यांनी पाहणी केली व पूर परिस्थितीचा आढावा घेतला अतिवृष्टीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी मी सदैव खंबीरपणे उभा असून बाधित शेतकऱ्यांनी खचून न जाता जोमाने कामाला लागावे असे आवाहन आमदार शामसुंदर शिंदे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना केले, यावेळी उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक, तहसीलदार व्यंकटेश मुंडे ,बालाजी इसातकर, सह गावकरी व सर्व मंडळ अधिकारी, तलाठी, सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. यावेळी आमदार शिंदे यांनी लोहा, कंधार मतदारसंघात ज्या ज्या भागात पूरस्थिती उद्भवलेली आहे या भागात तात्काळ उपायोजना करण्याचे निर्देश यावेळी आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी प्रमुख अधिकाऱ्यांना यावेळी दिले. यावेळी उस्माननगर चे पोलीस उपनिरीक्षक देवकते ज्येष्ठ नेते भास्करराव पाटील जोमेगावकर, माजी सरपंच पप्पू भुरे, चिंचोली चे सरपंच गोविंदराव पाटील चिंचोलीकर, मनोहर पाटील ढेपे, भूकमारीचे सरपंच आमदुरे, सचिन कुदळकर व या भागातील सर्व शेतकरी व अधिकारी ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
लोहा कंधार मतदारसंघातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामाचा पिक विमा मुदतीत भरण्याचे आवाहन यावेळी आमदार शामसुंदर शिंदे यांनी मतदारसंघातील शेतकऱ्यांना केले आहे.