
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- संभाजी गोसावी .
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दिल्ली दौऱ्यावर आले आहेत या दौऱ्यामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा ,राजनाथ सिंग जेपी नडा यांच्या भेटी घेतल्या. आम्ही शिवसेना आणि भाजप युती करुन निवडणुका लढवल्या होत्या. लोकांच्या मनात होते त्याप्रमाणे युतीचे सरकार आम्ही स्थापन केले आहे त्यानंतर वरिष्ठ नेत्यांच्या भेटीला आम्ही आलो आहोत हे सरकार लोकांचे आहे. लोकांच्या हिताचे जपणूक करणार आहे समाजांतील सर्वत्र घटकांना न्याय देणार हे सरकार आहे आता पंतप्रधान भेटून राज्यांच्या विकासांत त्यांचे वहिजन आम्ही समजुन घेणार आहोत असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद म्हटले या भेटीनंतर राज्यांच्या प्रगती आणि विकासासाठी केंद्र शासनांच्या सहकार्य आणि भक्कम पाठिंबा मिळून महाराष्ट्रांचा विकास होण्याचा विश्वांस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रातील सत्ता परिवर्तन नंतर नवयुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रथमच दिले दौऱ्यांवर आले आहेत दोन्ही नेते दिल्लीत सातत्यांने केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. या सगळ्यांत दोन्ही नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीची सदिंच्छा भेट घेतली ही पहिलीच भेट आहे मात्र सध्यांच्या राजकीय घडामोडी मध्ये ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.