
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- संभाजी गोसावी
फलटण.ता. आदर्की येथील भैरवनाथ एज्युकेशन सोसायटी शाळेची सालाबाद प्रमाणे पायी वारी दिंडी सोहळा संपन्न झाला. गेल्या दोन वर्षापासून कोरोनांने आपणा सर्वांनाच चांगलेच वडले होते. मात्र यंदा महाराष्ट्र शासनांने अखेर पायी दिंडीला परवानगी दिली यातच संपूर्ण महाराष्ट्रांतील शाळेतीलच विद्यार्थी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रांतील सर्व विभागांचे प्रशासन सुद्धा यंदाच्या पायी दिंडी सोहळ्यांमध्ये नाचू गाऊन चांगलेच दंग झाल्यांचे सर्वत्र पालखी सोहळ्यांमध्ये दिसून आले. फलटण तालुक्यांतील आदर्की याही वर्षी शनिवारी दिनांक ९जुलै रोजी भैरवनाथ एज्युकेशन सोसायटी शाळेचे सर्व विद्यार्थी प्राथमिक ज्युनिअर या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनीचा या दिंडीमध्ये सहभागी झाले होते. शाळेतील सर्व शिक्षक सहकारी कर्मचारी यांच्या वतीने आदर्की गावांतून विठू नामांचा गजर करीत माऊली,माऊली असा गजर करीत पायी दिंडी सोहळा भव्य अशी मिरवणूक काढण्यांत आली. यावेळी दोन वर्षांनी आदर्कीकरांना बाल चिमुकल्यांचा वारकरी वेशभूषा पाहायला मिळाला. या दिंडी सोहळ्यांमध्ये आदर्की गावातील ग्रामस्थ मंडळी माता बहिणी तरुण वर्ग यांनीही या पायी दिंडीमध्ये सहभाग घेतला. भैरवनाथ एज्युकेशन सोसायटी शाळेच्या सर्व शिक्षक सहकारी कर्मचारी महिला कर्मचारी यांनी पायी दिंडी सोहळ्यांसाठी चांगलीच मेहनत घेतली. त्यांच्या या कौतुस्पद कामगिरीबद्दल आदर्की परिसरांसह संपूर्ण फलटण तालुक्यांतुन चांगलेच कौतुक झाले. यावेळी भैरवनाथ एज्युकेशन शाळेचे बाळासाहेब कासार, सरस्थापन आप्पासौ नलावडे ,उप संस्थापक प्रकाश येवले,सचिव तसेच प्रिन्सीपल सौ. संगीता देशमुख मॅडम ,मनिषा निंबाळकर, शोभा खरात प्रीती टीचर व गौरी टीचर, ज्योती राजे संयोगिता जगताप सोनाली धुमाळ आधीं शिक्षक कर्मचारी यांनी या दिंडीमध्ये सहभाग घेतला.