
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी माकणी-गणेश विठ्ठलराव मुसांडे
माकणी :। लोहारा तालुक्यातील माकणी येथील तेरणा नदीच्या काठी आषाढी एकादशीनिमित्त श्री संत शिरोमणी मारुती महाराज यांच्या दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती
माकणी हे गाव श्री संत मारुती महाराजांच्या रुपाने प्रतिपंढरपूर म्हणून समजल्या जाणाऱ्या सकाळी सात वाजल्यापासून भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या पावसाने आज एकादशी निमित्त उघड दिल्यामुळे श्री संत मारुती महाराजांचे मंदिर परिसर भाविक भक्तांनी फुलून गेला होता मारुती महाराजांच्या मंदिरापासून तेरणा नदीपर्यंत भाविकांच्या रांगा लागल्या होत्या महिलांची विशेष गर्दी दर्शनासाठी होती ज्या भाविकांना पंढरपूरला जाणे शक्य नाही अशा भाविकांनी माकणी येथील संत शिरोमणी मारुती महाराज यांच्या दर्शनासाठी गर्दी केल्याने माकणी गावाला एकादशीनिमित्त जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते
तेरणा नदीच्या काठी भाविकांचा भक्तीचा मळा फुललेला दिसत होता
संत शिरोमणी मारुती महाराज यांच्या गादीचे वारस ह भ प महेश महाराज माकणीकर यांच्या दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासून प्रचंड गर्दी केली होती तसेच मंदिर परिसरात महाप्रसादाचे वाटप करण्यात आले होते यावेळी मागणी परिसरातील अनेक भाविक भक्तांनी भाविकांना दर्शन शांततेत मिळण्यासाठी अथक परिश्रम घेतले
परिसरातील . आषाढी एकादशी निमित्त श्री संत शिरोमणी मारुती महाराज यांच्या दर्शनासाठी मंदिरात दर्शनासाठी सकाळ पासूनच भाविक-भक्तांच्या रांगा दिसून आल्या, दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी अतिशय भक्तिमय वातावरणात दर्शनासाठी आलेल्या भाविक-भक्तांना उपवासाचे फराळीचे प्रसाद वाटप करण्यात आले.