
दैनिक चालू वार्ता गंगापूर प्रतिनिधी-सुनिल झिंजूर्डे पाटिल
आ. प्रशांत बंब व ग्रामपंचायत सदस्य नारायण वाकळे यांच्यावतीने कामाला सुरुवात…..
गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन आ. प्रशांत बंब यांच्या मार्गदर्शनाखाली व ग्रामपंचायत सदस्य नारायण वाकळे यांच्यातर्फे बकरी ईदचे औचित्य साधत सक्खीर भाई मोहल्यातील नागिना मस्जिद परिसरातील सहान जागेमध्ये पेव्हर ब्लॉक बसवण्याचे उद्घाटन करून प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात आली.
यावेळी नगिणा मस्जिदचे मौलाना मोबिन पटेल सहाब भाजपयुमोचे जिल्हापाद्यक्ष अमोल पाटील जाधव, रजाक पठाण संजय भाऊ पांडव, बाजार समिती संचालक सुरेश जाधव, माजी उपसरपंच जनसेवक गणेश व्यवहारे, ग्रामपंचायत सदस्य सर्वश्री.अशोक सौदागर,कल्याण पाटील पवार व मौलाना आझाद फ्रेंड सर्कलचे पदाधिकारी व नागरिक यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती…