
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : विधिमंडळ सचिवालयाने शिंदे आणि ठाकरे गटाच्या आमदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यामध्ये आदित्य ठाकरेंना वगळण्यात आलं आहे. मात्र, माझ्यावर उगाच खास प्रेम करण्याची गरज नाही, असा टोला आदित्य ठाकरेंनी शिंदे गटाला लगावला
बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा झटका बसला आहे. महाराष्ट्र विधिमंडळ सचिवांनी दोन्ही गटातील शिवसेनेच्या ५३ आमदारांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. यामध्ये शिंदे गटाच्या 39 आणि ठाकरे गटाच्या 14 आमदारांचा समावेश आहे. विधानसभा अध्यक्ष निवडीच्या वेळी पक्षाने जारी केलेल्या व्हीपचे पालन न केल्याने आणि विश्वासदर्शक ठरावासाठी मतदान केल्याचा आणि पक्षाच्या विरोधात मतदान केल्याचा आरोप दोन्ही गटांच्या आमदारांवर आहे. मात्र, या नोटीसमध्ये आदित्य ठाकरे यांचं नाव वगळण्यात आलं आहे. यावरुन आता आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाला टोला लगावला आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.